शेतकऱ्यांसाठी खुशखबर!!!! जिल्ह्यात आयटीसह अँग्रो इंडस्ट्रियल पार्क उभारणार

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

नवीन नाशिक : जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, तसेच येणाऱ्या काळात नाशिक येथे आयटी व ॲग्रो इंडस्ट्रियल पार्क उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

अंबड रिक्रिएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. यांच्या अडीअडचणींबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अर्जुन गुंडे, एमआयडीसीचे मुख्य व्यवस्थापक नितीन गवळी, जिल्हा उद्योग कें द्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, मुख्य समन्वयक – धनंजय बेळे, सल्लागार समिती ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस ललित बूब उपस्थित होते. आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यात सुरुवातीला १०० एकरमध्ये आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कृषी पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रियल पार्क उभारण्यासाठी शासनामार्फत मदत करण्यात येईल, तसेच जिल्ह्यात डाटा सेंटरचा मोठा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात आयटीसह अँग्रो इंडस्ट्रियल पार्क उभारणार 1 Taluka Post | Marathi News
अँग्रो इंडस्ट्रियल पार्क

औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पाणी, वीज व रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी जिल्ह्यातील उद्योजकां समवेत बैठकांचे आयोजन करण्यात यावे. ज्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल.

एमआयडीसीमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत २ योजनेतून उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे येथे आकारण्यात येणाऱ्या घरपट्टीत झालेली वाढ लक्षात घेता त्याबाबत आवश्यक निर्णय घेऊन औद्योगिक क्षेत्रासाठी असणाऱ्या नियमानुसार त्यावर योग्य निर्णय महानगरपालिकेने घ्यावा. जकात नाक्याच्या बाजूला महानगरपालिकेची जागा असेल किंवा एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जागा असल्यास त्याठिकाणी येत्या पंधरा दिवसांत ट्रक टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना उद्योगमंत्री सामंत यांनी दिल्या.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉरमध्ये नाशिक जिल्ह्याचा सहभाग करण्यात यावा, तसेच बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरु होण्यासाठी शासन पातळीवर निर्णय होणे आवश्यक असून, आयटी उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात यावी. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक क्लस्टर उभारण्यात यावे, अशी मागणी ‘खा. हेमंत गोडसे यांनी यावेळी केली.