Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!

Last Updated on December 18, 2022 by Taluka Post

Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गाय-म्हैस, शेळ्या-मेंढ्या खरेदी करण्यासाठी सरकारी अनुदान दिले जात आहे. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शेतकरी, बेरोजगार तरुणांना दुभत्या गाय-म्हशींचे गट, शेळी-मेंढ्यांचे गट, तसेच किमान एक हजार कुक्कुटपालनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

सरकारी योजनेत पात्र व्यक्तींना प्रत्येकी 100 कुक्कुट पिल्ले व 28 तलंगा गटांचे वाटप केले जाणार आहे. 2022-23 या वर्षात या योजनांच्या लाभासाठीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • टोल फ्री क्रमांक –  1962 किंवा 1800-233-0418
  • तालुका पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
  • जिल्हा परिषदेतील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
  • पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय

इथे करा ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com/webui/registration

हेही वाचा: Pradhan Mantri Kisan Urja:शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान योजना.

Comments are closed.