Government Yojana : आनंदाची बातमी!! ‘ या’ शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 15000 रुपये,शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Last Updated on February 15, 2023 by Jyoti S.

Government Yojana

सरकारी योजना(Government Yojana) : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच राज्यातील धान उत्पादकांना हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी 1000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नुकतीच घोषणा केली होती. खरीप हंगाम 2022-23 मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त भातशेतीखालील जमिनीच्या आधारे प्रति हेक्टर 15,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. ही रक्कम २ हेक्टर मर्यादित दिली जाईल.

अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मागील खरीप हंगाम 2021-22 मध्ये 1 कोटी 33 लाख 79 हजार 892 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. मात्र, या हंगामात धानासाठी प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. या खरीप हंगामात(Government Yojana) धान उत्पादकांना प्रति क्विंटल 700 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. मात्र ही रक्कम प्रति क्विंटल दिली जात असल्याने काही अडचणी आल्या.

50 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे 50 क्विंटलपेक्षा जास्त धान खरेदी केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शेजारील राज्यातून महाराष्ट्रात धान विक्रीसाठी आणले जात असल्याच्याही तक्रारी होत्या.

हेसुद्धा वाचलात का?

Crop loan updates : नाशिक जिल्ह्यासह सर्व जिल्यातील पीक विमा यादी जाहीर केली आहे,यादीतील तुमचे नाव तपासा.


यावर्षी सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी 2022-23 योजनेसाठी नोंदणी केली आहे आणि 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धानाचे उत्पादन झाले आहे. सरकारी योजना