Tuesday, February 27

Grow fodder earn money: मोफत बियाणांसाठी १२ हजार अर्ज; २.५० कोटीचे बियाणे देणान

Last Updated on November 24, 2023 by Jyoti Shinde

Grow fodder earn money

आता ‘चारा पिकवा, पैसे कमवा’ योजना; १.३० कोटींचे बियाणे वाटप

कमी पावसाने यंदा चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून चाऱ्याची वाहतूक होऊ नये. येणाऱ्या हंगामात ही स्थिती उद्भवू नये, यासाठी शासनाने चारा वैरण विकास योजना सुरू केली असून चारा पिकविण्यासाठी १०० टक्के अनुदानातून मोफत बियाणे दिले जात आहेत. बुधवारअखेर (दि.२२) १२ हजार शेतकऱ्यांचे अर्ज बियाणांसाठी उपलब्ध झाले होते. त्यातील जवळपास ३ हजार शेतकऱ्यांना एक कोटी ३० लाख रुपयाचे मोफत बियाणे वाटप झाले असल्याची माहिती जि.प.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

टंचाई पाहता २,४०० ते ३,७०० रुपये शेकडा या दराने जिल्ह्यात चाऱ्याची विक्री होत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पशुधनाची संख्या व उत्पादित होणारा चारा यांच्या तुलनेत राज्यात ४४ टक्के चाऱ्याची तूट भासू शकते. पशुपालकांना चारा उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप योजना सुरू केली आहे.

हेही वाचा: AI Chatbot For Students: आता ‘एआय’ शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणार; कानपूर आयआयटीने देशांतर्गत चॅटबॉट विकसित केले!

यात १०० टक्के अनुदान मिळणार आहे. दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा देणे आवश्यक आहे. सध्या अपेक्षित चारा उत्पादित झाला नाही. त्यामुळे मोफत बियाणे वाटप योजना सुरू करुन चारा पिकवा व विका आणि स्वत:च्या गुरांनाही वापरा असे धोरण शासनाने आखले आहे.Grow fodder earn money

असे बियाणे वाटप


■ २६६ पशुवैद्यकीय दवाखान्यांत चारा बियाणे वितरण.

■ २२ दिवसांपासून योजना प्रत्यक्षात अमलात.

■ २.५० एकरपर्यंत जमिनीसाठी बियाणे वाटप सुरू
चार हजार रुपयांपर्यंतचे बियाणे प्रत्येक शेतकरी गटास मिळणार

कमी पावसामुळे वैरण महागली.

यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे रब्बीची लागवडदेखील आजतागायत फक्त सात टक्के झाली आहे. हीच अवस्था चाऱ्याचीही आहे. त्यामुळे चाऱ्याचे उत्पादन कमी झाले असून वैरण महागली आहे.

वैरण पिकविण्यासाठी १०० टक्के अनुदान


यात प्रति लाभार्थी एक हेक्टरच्या क्षेत्रात वैरण उत्पादन घेण्यासाठी १०० टक्के अनुदानावर चार हजार रुपयांच्या मर्यादित वैरणीच्या बियाणांचा / ठोंबाचा पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांकडे यापेक्षा कमी क्षेत्र असल्यास प्रत्यक्ष क्षेत्राच्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे चारा उत्पादन वाढीस मदत मिळणार आहे. चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात दुधाळ पशुधनास पौष्टिक चाऱ्याची आवश्यकता असते. दुधाळ पशुधनास पुरेशा प्रमाणात व पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू आहे.Grow fodder earn money

हेही वाचा : How To Reuse Old Clothes: जुने कपडे फेकून देण्याऐवजी या 7 प्रकारे वापरा, तुमची सर्जनशीलता पाहून लोक टाळ्या वाजवतील.

जनावरे सांभाळणे परवडेना

यंदा पाऊस कमी झाल्याने अपेक्षित चाऱ्याचे उत्पादन झाले नाही. त्यामुळे चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. चाऱ्याची टंचाई अन् भाव जास्त यामुळे जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे.Grow fodder earn money


शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. दुधाळ जनावरांना हिरवा व चारा मिळाल्यास दूध, ज्वारी, सोयाबीन, मूग यासह यंदा पिकाचेही अपेक्षित उत्पादन नसल्याने चारा टंचाई निर्माण होते.

बचत गटांनाही मिळणार संधी

• बचत गटांना चारा बियाणे घेण्यासाठी केले आवाहन.

उन्हाळ्यात वाढणार चाऱ्याचे भाव.

नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातून चारा जाऊ नये यासाठी लक्ष.

उसाचा चारा म्हणून वापर वाढणार.

जंगलातले गवतही यंदा कमीच मिळणार.

● चाराबंदीसाठी कडक अंमलबजावणीचे आदेश

हे बियाणे मिळणार


चारा पिकविण्यासाठी मका, न्यूट्रिफिडल, बाजरा नं. १, जव्हा शुगर ग्रेज या जातींचे बियाणे दिले जात आहेत.Grow fodder earn money

असे बियाणे वाटप..


■ २६६ पशुवैद्यकीय दवाखान्यांत चारा बियाणे वितरण.
२२ दिवसांपासून योजना प्रत्यक्षात अमलात.

■ २.५० एकरपर्यंत जमिनीसाठी बियाणे वाटप सुरू.

■ चार हजार रुपयांपर्यंतचे बियाणे प्रत्येक शेतकरी गटास मिळणार.

कमी पावसामुळे वैरण महागली

यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे रब्बीची लागवडदेखील आजतागायत फक्त सात टक्के झाली आहे. हीच अवस्था चाऱ्याचीही आहे. त्यामुळे चाऱ्याचे उत्पादन कमी झाले असून वैरण महागली आहे.

हेही वाचा: Reliance SBI Card: रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च, ग्राहकांना मिळतील उत्तम ऑफर

शासनाने चाऱ्याची संभाव्य टंचाई पाहता मागेल त्याला ठी चायासाठी बियाणे ही योजना सुरू केली आहे. अजून एक ते दीड कोटीचे बियाणे देणार असून शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी तालुका कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.Grow fodder earn money