Last Updated on January 7, 2023 by Taluka Post
Harvesting Machine: यंत्राने कापणीकरिता आले ‘कनक’
अकोला(Harvesting Machine) : शेतीकाम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने आता पीकपेरणी ते कापणीपर्यंत यंत्र, अवजारे निर्मितीवर भर देण्यात येत आहे; पण त्यासाठी पारंपरिक पिकांऐवजी यंत्राने कापणी करता यावी, अशी पिके हवी आहेत याच अनुषंगाने अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंत्राने काढता यावे असे ‘पीडीकेव्ही- कनक’ हरभन्याचे वाण विकसित केले आहे या वर्षी शेतकऱ्यांना है वाण पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे.(Harvesting Machine)
खरीप हंगामातील पिके काढणीनंतर रब्बी हंगामात राज्यातील शेतकरी जवळपास २० लाख हेक्टरवर हरभरा पीक घेतात कापणीवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून या कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाने पीडीकेव्ही-कनक हरभऱ्याचे वाण विकसित केले आहे हे वाण भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशसाठी प्रसारित करण्यात आले आहे यांत्रिकी पद्धतीने कापणीकरिता प्रसारित करण्यात आलेले हे वाण १०६ ते १११ दिवसांत लवकर परिपक्व होणारे आहे.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
या वाणाचे १०० दाण्यांचे वजन २१७६ ग्रॅम असून, ओलिताखालील उत्पादन हेक्टरी २५ ते २८ क्विंटल एवढे आहे कोरडवाहूमध्ये याला एखाद्या पाण्याची पाळी आवश्यक आहे राज्यात हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र विदर्भात आहे उत्पादन क्षमताही ही हेक्टरी ११ ते १२ क्विंटल एवढी आहे आता शेतकऱ्यांना पीडीकेव्ही- कनक हरभऱ्याचे वाण मिळाले आहे.
आर्थिक बचत होणार सध्या हरभरा काढणीसाठी
हेक्टरी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो मळणीचा खर्च हा वेगळा लागतो; परंतु यंत्राने कापणी केल्यास शेतकऱ्यांची जवळपास तीन हजार रुपयाची बचत होणार असल्याचा दावा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे हे वाण शेतकयांसाठी फायद्याचा ठरणार असल्याने या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी समाधान व्यक्त केले आहे
शेतकऱ्यांची मागणी
मररोग व घाटेअळीस प्रतिकारक असलेल्या कनक हरभयाच्या वाणासाठी शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे या वर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे
हेही वाचा: Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान