Grape grower: द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीला बसणार चाप

Last Updated on December 23, 2022 by Jyoti S.

Grape grower: निफाडच्या बैठकीत विशेष पोलिस महानिरीक्षकांचा इशारा

द्राक्षमाल(Grape grower) व्यवहार करणारे व्यापारी व शेतकरी यांच्यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाईल तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी कठोर पावले उचलली जातील, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी स्पष्ट केले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

निफाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पोलिस प्रशासन, द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समिती प्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी देशांतर्गत व देशाबाहेरील द्राक्षमाल व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीबाबत मत मांडत पोलिस प्रशासनाकडून द्राक्ष बागायतदारांचे प्रबोधन करावे, व्यापारी वर्गाची माहिती, पायलट, सर्व्हिस प्रोव्हायडर यांची माहिती नोंदविण्याची मागणी केली. द्राक्ष बागायतदारांचे द्राक्षमाल व्यवहार हे कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी सौदा पावतीचा मसुदादेखील मांडण्यात आला. याबाबत जानेवारी महिन्यातच द्राक्ष बागायतदारांचा प्रबोधन महामेळावा घेऊन त्याबाबत जागृती केली जाईल,असेही शेखर यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय संचालक अँड. रामनाथ शिंदे, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे आदी उपस्थित होते.हेही वाचा: Viticulture : द्राक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

निफाड नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक बी. जी. शेखर यांना निवेदन देताना राज्य द्राक्ष बागायतदार(Grape grower) संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले. समवेत पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, द्राक्ष बागायतदार संघाचे र्यालयामध्ये पदाधिकारी अँड. रामनाथ शिंदे, नरेंद्र वाढवणे, संजय लोंढे.