Last Updated on December 26, 2022 by Jyoti S.
Honey farming scheme: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र
Honey farming scheme: (मधमाशी पालन) योजनेंतर्गत होतकरु शेतकऱ्यांना मधमाश्या पालनासाठी मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी वस्तूस्वरुपात ५० टक्के अनुदान दिले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात २७ शेतकऱ्यांना अशा प्रकारचे अनुदान देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच मधमाश्याचे संवर्धन हाही या योजनेचा उद्देश आहे.
अटी काय? या योजनेचा लाभ
घेण्यासाठी संबंधित अर्जदार साक्षर असावा. त्याने दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. १० मधपेट्या घेण्याची तयारी व उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. जर अर्जदाराची स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाते. . व्यावसाय सुरू करण्यापूर्वी मंडळात बंधपत्र लिहून द्यावे.

काय आहे योजना?
■ शेतकऱ्याने तयारी दाखविल्या- नंतर त्याला दहा दिवसांचे • प्रशिक्षण दिले जाते.
योजने अंतगर्त साहित्याच्या स्वरुपात ५० टक्क्यांपर्यंत मदत करता येते, तर संबंधितांना ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागते. शासकीय दरानुसार या मधाची खरेदी करण्यात येत असते.
अर्ज कोठे कराल?
या योजनेसाठी असल्यास खादी ग्रामोद्योग महामंडळाकडे ऑफलाइन अर्ज सादर करावा(Honey farming scheme). यानंतर महाबळेश्वर येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर लाभ दिला जातो.हेही वाच: Subsidy for dairy business: शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी आता मिळणार ५० टक्के अनुदान
प्रशिक्षणही मोफत

ज्या शेतकऱ्यांना मधमाश्या पालन करावयाचे आहे त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधल्यानंतर मंडळामार्फत त्यांना मधमाश्या पालनाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे शासनाचे प्रशिक्षण केंद्र आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
वर्षभरात २७ जणांनी घेतला लाभ
मधमाश्या पालनासाठी अनेक शेतकरी पुढे येत असून, वर्षभरात जवळपास .२७ लाभार्थीना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाते.
मध केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. वैयक्तिक आणि संस्था पातळीवर या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. अधिकाधिक शेतकऱ्यांनी मोफत प्रशिक्षण घेउन योजनेचा लाभ घ्यावा यासाठी अर्ज सादर करावेत.
-किशोर सुरवाडे, मध अधिकारी, नाशिक