Last Updated on January 9, 2023 by Jyoti S.
Human Composting : जिवलगांच्या मृतदेहांपासून सुपीक खत!
Table of Contents
जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याचा ढीग वाढतोच आहे. हा कचरा कुठे टाकायचा, त्याचं काय करायचं, त्याचा निचरा कसा करायचा, हा प्रश्न अख्ख्या जगापुढे डोकेदुखी ठरतो आहे. त्यासाठी काही प्रगत देशांनी एक सोपा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे.
आपल्याला नको असलेला कचरा त्यांनी थेट गरीब, अविकसित देशांत नेऊन टाकायला सुरुवात केली आहे. पुन्हा त्यातही आपण ‘परोपकार’ करत असल्याचा त्यांचा अविर्भाव आहे. अविकसित देशांत हा जो कचरा नेऊन टाकला जातो, त्यात ई-वेस्टचं प्रमाण मोठं आहे. याच कचऱ्यातला ‘चांगला’ भाग निवडून अविकसित देशांत त्याचा पुनर्वापर केला जातो.
विकसित देश हा कचरा तर विकतातच, पण आपल्याकडची(Fertilizer ) घाण दुसऱ्या देशांत नेऊन टाकताना आपण त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहोत, अशी शेखीही मिरवतात. पण, त्यांच्या या खोडीमुळे अविकसित देशांचे मोठे नुकसान होत आहे. तेथील प्रदूषणाचा प्रश्नही सातत्याने वाढतो आहे. कारण ई- वेस्टमधील फारच कमी भागाचा पुनर्वापर करता येतो. शिवाय ज्या भागाचा पुनर्वापर केला, तो कचराही खूपच थोड्या अवधीत पुन्हा निकामी ठरतो.
कचऱ्याच्या जोडीला आता आणखी दुसरा एक प्रश्न अख्ख्या जगाला भेडसावतो आहे, तो म्हणजे मृतदेहांचा अख्ख्या जगाला भेडसावतो आहे, तो म्हणजे मृतदेहांचा अख्ख्या जगाला भेडसावतो आहे, तो म्हणजे मृतदेहांचा
या मृतदेहांचं(of corpses) काय करायचं?
यावरून अनेक देशांची मती गुंग व्हायची वेळ आली आहे. कारण बऱ्याच देशांमध्ये मृतदेह पुरले जातात. त्यासाठीची जागा कुठून आणायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. काही देशांमध्ये तर येत्या दहा-बारा वर्षांत मृतदेह पुरण्यासाठी थोडीशीही जागा शिल्लक राहणार नाही, इतका हा प्रश्न भीषण आहे.
शिवाय एखाद्याचं निधन होणं म्हणजे त्यांच्या कुटुंबियांसाठी तो मोठाच भावनिक प्रश्न. त्यासाठीची जागाच उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागणार, त्यामुळे अमेरिकेसारख्या काही देशांत या प्रश्नाला आता तसंच भावनिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न होतो आहे.
काय आहे हा उपाय?
तिथे काय केलं जातं मृतदेहांचं?
अमेरिकेतील न्यू यॉर्क(New York) राज्यानं आता मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ‘ह्यूमन कम्पोस्टिंग'(Human Composting) हा एक नवा इको-फ्रेंडली(eco-friendly) पर्याय पुढे आणला आहे. यामुळे आता कोणाचंही निधन झालं तर तो मृतदेह जाळण्याची किंवा पुरण्याची गरज नाही.
त्यासाठी जागेचीही गरज नाही. या मृतदेहाचं पर्यावरणपूरक पद्धतीनं सुपीक खतामध्ये रूपांतर करण्याची अभिनव कल्पना त्यांनी पुढे आणली आहे. शिवाय हे करताना या पर्यायाला एक भावनिक टचही सरकार, व्यवस्थापनानं
हेही वाचा: Nose health tips : म्हणूनच तुमचे नाक नेहमीच थंड होते-हिवाळा नसतानाही!!
दिला आहे. सरकारचं म्हणणं आहे, आपली आवडती व्यक्ती जर मृत्यूनंतरही कायमची तुमच्याजवळ राहावी असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या व्यंक्तीच्या मृतदेहाचे सुपीक खत तयार करून ते आपल्या बागेतल्या झाडांना, कुंडयांना घाला.
हे खत कोणाला दान करा किंवा जंगलात, मोकळ्या माळरानात हे खत पसरून टाका आणि नवी सजीवसृष्टी(Human Composting) बहरून येण्यासाठी आपलं सकारात्मक योगदान द्या. नागरिकांनाही ही कल्पना पसंत पडते आहे. त्यामुळे सरकारपुढचे अनेक प्रश्न सोपे होताहेत.
यासंदर्भात संशोधन आणि मृतदेहांचं सुपीक खतात रूपांतर करणाऱ्या ‘रिकंपोज'(Recompose) या कंपनीचं म्हणणं आहे.
एका मृतदेहापासून ३६ बॅगा खत!
अमेरिकेत वॉशिग्टन, कोलोरैडो, ओरेगॉन, कैलिफोर्निया, व्हर्मोन्ट यासारख्या राज्यांनंतर न्यू यॉर्कमध्येही आता ह्यूमन कम्पोस्टिंगला परवानगी देण्यात आली आहे. या पद्धतीत एका मृतदेहापासून तब्बल ३६ बॅगा सुपीक खत तयार होतं. ज्या व्यक्तींचा मृत्यू टीबीमुळे झाला आहे. किवा ज्या रुग्णांवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत, त्या व्यक्तीच्या मृतदेहाचं मात्र ‘ह्यूमन कम्पोस्टिंग(Human Composting) केलं जात नाही.
मृतदेह पारंपरिक पद्धतीनं दहन किंवा दफन करण्यापेक्षा या पद्धतीनं तब्बल आठपट कमी ऊर्जा बदल करता येईल. खर्च होते. जागेचा प्रश्न पूणपर्ण मिटतो, प्रदूषण होत नाही; शिवाय मृतदेह, त्यातील हाडं, दात वगैरे गोष्टी पूर्णपणे विघटित होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो. पण, या पद्धतीमुळे केवळ महिन्याभराच्या आत मृतदेहापासून अतिशय सुपीक खत मिळते.
‘ह्यूमन कम्पोस्टिंग’च्या(Human Composting) या पद्धतीत मृतदेह स्टेनलेस स्टीलच्या एका सिलिंडरमध्ये ठेवला जातो. कोणतीही गोष्ट लवकर विघटीत व्हावी, यासाठीचे काही पदार्थ, माती, सूक्ष्मजंतू त्यात टाकले जातात. त्यामुळे मानवी शरीराचं अतिशय लवकर खतात रूपांतर होतं.
शिवाय हे खत कुठल्याही पद्धतीनं घातक नाही, त्यात कोणतेही विषारी पदार्थ नाहीत याची काटेकोर तपासणी केली जाते आणि त्यानंतरच ते नातेवाईकांना सुपूर्द केलं जातं.