ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.

गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त

नाशिक : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, मका यासह भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका द्राक्षबागांना बसत असून, शेतकरी धास्तावले आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकरी कीडनाशकांची फवारणी करीत असून, शेतकऱ्यांचा यामुळे खर्च वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक शहरातही गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.

खरेतर ऋतुमानाप्रमाणे हिवाळा सुरू असला, तरी नाशिक शहरात गेल्या २ ते दि ३ दिवसांपासून फारशी थंडी जाणवत नाही. रविवारी स (दि.४) दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले होते. पण, पावसाने नुसताच हलका शिडकावा केल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. पण, आता सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.

रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे. पण, रब्बीतील गहू आणि हरभऱ्याच्या वाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे.त्यामुळे त्याचा विपरित परिणाम उत्पादनावर होऊ शकतो . स्वच्छ वातावरण आणि गारठा असेल तरच गव्हाची आणि हरभऱ्याची वाढ जोमदार होऊ शकेल.

Comments are closed.