Saturday, March 2

kandyache navin vaan : कांद्यामुळे वांदा झालेला असतांना शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर उन्हाळ कांद्याला टक्कर देण्यासाठी आलाय लाल कांद्याचे नवं वाण

Last Updated on April 14, 2023 by Jyoti S.

kandyache navin vaan

थोडं पण महत्वाचं

kandyache navin vaan: बाजारात लाल रंगाच्या कांद्याला चांगली मागणी आहे. त्या जमिनीवर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केंद्राने उन्हाळी कांद्याइतकाच टिकाऊपणा असलेला नवीन वाण विकसित केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


आता गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती हि अजून फारशी चांगली झालेली नाही .काही ठिकाणी उत्पादन खर्चही निघत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात लाल कांदा असेल तर लगेच विकावा लागतो. त्याचे दीर्घ शेल्फ लाइफ देखील नाही. दरम्यान, कांदा उत्पादक मेतकुटी आली.

एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असताना आनंदाची आणि दिलासा देणारी बाब समोर आली आहे. उन्हाळी कांद्याइतकाच टिकाऊपणा आणि लाल कांद्यासारखा दिसणारा कांद्याचा नवीन प्रकार बाजारात दाखल होणार आहे.

बाजारात लाल रंगाच्या(kandyache navin vaan) कांद्याला चांगली मागणी आहे. त्या आधारावर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केंद्राने उन्हाळी कांद्याप्रमाणेच टिकाऊपणा असलेल्या लाल कांद्याची नवीन जात विकसित केली आहे.

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules : गॅस सिलिंडर धारकांसाठी चांगली बातमी,10 एप्रिल 2023 पासून नवीन नियम लागू

380 ते 400 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारी ही जात आहे. लाल कांद्याच्या आता या नवीन जातीला NHRDF फुरसुंगी असे नाव देण्यात आले आहे. लवकरच आता हे बियाणे शेतकऱ्यांना अधिक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


ही जात 110 ते 120 दिवसांत तयार होते. उन्हाळी(unhali) कांद्याप्रमाणे पाच ते सात महिने शेल्फ लाइफ असलेली ही नवीन जात आहे. वजनही चांगले असल्याने हेक्‍टरी उत्पादन ३८० ते ४०० क्विंटल असल्याचा दावा केला जात आहे.

या नवीन कांदा पिकात करपा व मावा रोगाचे प्रमाण कमी आहे. याशिवाय हा कांदा साठवल्यानंतर तपकिरी होण्याचे प्रमाणही कमी असते. तर, त्याचा रंग लाल असल्याने त्याला बाजारात जास्त मागणी असेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules : आता व्हॉट्सअॅपवरून देखील आपल्याला गॅस सिलिंडर बुक करता येणार ; कसे ते पहा

NHRDF फुरसुंगी जातीचे बियाणे 15 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामध्ये नाशिक(Nashik) जिल्ह्यातील चितेगाव(Chetegaon), लासलगाव(Lasalgaon) आणि सिन्नर(Sinner) केंद्रावर या नवीन जातीचे बियाणे उपलब्ध होणार आहे.

कांद्यावर नेहमीच वेगवेगळे संशोधन करणाऱ्या नाशिक(nashik) जिल्ह्यातील निफाड(Niphad) तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केंद्राने (NHRDF) रब्बीसाठी नवीन वाण विकसित केले आहे.

हेही वाचा: Gomutra health tips: गोमूत्र प्यायल्यास काय होईल? संशोधनातुन समोर आली धोकादायक माहिती!

लाल रंगामुळे बाजारात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरेल. नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च सेंटर, प्लांट पॅथॉलॉजीचे तांत्रिक अधिकारी मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकाराची किंमत विक्रीच्या वेळीच स्पष्ट केली जाईल.

Comments are closed.