Kisan Long March 2023 : पायीच अस्वस्थता, शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे वातावरण तापले; सरकारला जाग कधी येणार?

Last Updated on March 19, 2023 by Jyoti S.

Kisan Long March 2023

Kisan Long March 2023 : नाशिकहून मुंबईच्या(nashik-mumbai) दिशेने किसान लाँग मार्चला सुरुवात झाली आहे. 12 मार्चपासून सुरू झालेल्या या पदयात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले असून किसान सभा या मोर्चाचे प्रतिनिधित्व करत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आताच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे. चालत असताना प्रकृती खालावल्याने एका शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे वातावरण तापले असून सरकारला कधी जाग येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नाशिकहून मुंबईला जात असताना पुंडलिक अंबादास जाधव या शेतकऱ्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. यानंतर पुंडलिक यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पुंडलिकचा मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूमुळे वातावरण तापले असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने कधी विचार करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: जमिनीचा 7/12 उतारा, 8 अ काढण्याची सर्वात सोपी पद्धत होतेय जोरदार व्हायरल; फक्त 1 मिनिटांत ही Trick वापरून करा Download

दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मृत पुंडलिकच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आपल्या मागण्यांबाबत शेतकरी आक्रमक झाले असून, लाँग मार्चला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.