Last Updated on January 2, 2023 by Jyoti S.
Kulitha Rates: आता गव्हापेक्षाही कुळीथाला मिळतो जास्त दर
लोहोणेर(Kulitha Rates): बोलणाऱ्याचे कुळीथ विकले जातात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही ही म्हण सध्या तरी सार्थ ठरत आहे. कारणही तसेच आहे. कुळीथाने शंभर रुपये किलोचा टप्पा गाठला आहे.
आधीच्या काळी जे कडधान्य दुर्लक्षित होते, तेच कुळीथ (धान्य सध्या सर्वाधिक भाव खात आहे. हलक्या जमिनीत घेतले जाणारे कुळथाचे पीक फारसे कुणी करत नसले तरी त्यास प्रतिकिलो १०० रु. इतका भाव आहे. थंडीच्या( cold) दिवसात या कडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांना मागणी वाढली आहे.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
कुळीथले फूल येत नाही अशी जमीन’ म्हणजे की ज्या जमिनीवर कुळीथासारखे सर्वात हलक्या प्रकारचे पीक सुद्धा पिकत नाही. याचाच अर्थ इतर धान्यांच्या तुलनेत कुळीथाला हलका दर्जा यापूर्वी दिला जात होता.
परंतु अलीकडे कुळीथ या कडधान्यात अनेक पोषक तत्त्वे आणि उपयुक्त वनस्पतीजन्य रसायने असल्याने कुळीथ हे औषधी गुणधर्म असणारे कडधान्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या कडधान्यात लोह असल्याने थंडीत ते उष्णता वाढवते, ताकद देते. त्यामुळे हिवाळा या ऋतूत तर कुळीथापासून बनवणाऱ्या पदार्थांना अधिक मागणी असते.
कुळीथाचे शेंगोळे अर्थात कुळीथची जिलेबी, कढण, उसळ, पिठले यांना विशेष मागणी असते. लग्नसमारंभामध्ये बफे जेवणात तसेच शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये असे पदार्थ आवर्जून केले जातात. नाशिकमध्ये झालेल्या कृषीथॉन प्रदर्शनात या पदार्थांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
कुळीथ पिकासाठी हलकी जमीन ही चालते. पारंपरिक पिकांमध्ये कुळीथाचे उत्पादन फायदेशीर ठरू शकते त्यामुळे काही उपक्रमशील शेतकरी या पिकाला प्राधान्य देऊ लागले आहेत.
कुळीथाचे काही औषधी गुणधर्म:
■ कुळीथाचे पदार्थ खाल्ल्यामुळे वात व कफ कमी होतो.
■ खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर केला जातो.
■ कुळीथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते.
■ कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्याने मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते,
■ शिजवलेल्या कुळीथाची फोडणी ताकामध्ये देत तयार झालेले कढण वातनाशक असते.
■ अंगावर पित्ताच्या गाठी आल्यास कुळीथाचे पीठ लावतात.
फास्टफूड(Fast Food) खाऊन आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा घरीच भरडधान्य व कडधान्य यांचा योग्य वापर केल्यास चव आणि पौष्टिकता दोन्ही मिळतील. त्यादृष्टीने विचार केल्यास आठवड्यातून किमान दोन ते तीनवेळा आपल्या आहारात कुळीथाच्या पदार्थांचा आवर्जून समावेश करावा.
– डॉ. राजेंद्र गुंजाळ, देवळा मुळातच कुळीथचे उत्पादन अल्प मिळते. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे दुर्लक्ष करतात. त्यात त्याच्या सुधारित वा संकरित जाती नाहीत. उत्पादन कमी आणि त्यात मागणी वाढल्याने भावात(in price) तेजी येणे स्वाभाविक आहे. यामुळे या पिकाने लक्ष वेधून घेतले आहे. योग्य मशागत करून आणि विशेष लक्ष देत उत्पादन घेण्यासाठी शेतकयांनी प्रयत्न करावेत.- बाळासाहेब देवरे, वाजगाव सेंद्रिय धान्य उत्पादक शेतकरी
हेही वाचा: Eknath Shinde: राज्यातील शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरचे स्वप्न