Last Updated on December 12, 2022 by Taluka Post
Maharashtra: राज्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
यवतमाळ : भारतीय खाद्य निगमने १४ जिल्ह्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची झाली आहे. गहू आणि तांदूळ न मिळाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सन २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा आला. २०१५ पासून राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित करण्यात येत आहे. प्रत्येकांना किमान पोटभर अन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जात होते.
दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात होते. मात्र, एपीएल शेतकरी गटाचे धान्य टप्याटप्प्याने थांबविण्यात आले आहे. यात जुलै महिन्यापासून गहू आणि सप्टेंबर महिन्यापासून तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे धान्य थांबल्याने ते चिंतेत सापडले आहे.
एफसीआयकडून कोटा न मिळाल्याने शेतकरी गटातील धान्याचे वितरण झाले आहे. वरिष्ठांकडे ही बाब मांडण्यात आली आहे. कोटा आला तर धान्याचे वितरण नक्की होईल.-सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ