
Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.
जिल्ह्यातील १४ समित्यांचा समावेश
नाशिक : राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील दि. 31डिसेंबर अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 281 सह नाशिक जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी जाहीर होऊन हरकतीची प्रक्रियाही सुरू झाली होती. परंतु, सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुका दि. 15 मार्च 2023 पर्यंत थांबवल्या गेल्या आहेत.
कोरोना संकटापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुहूर्त लागला होता. यात 29 जानेवारी रोजी मतदान, तर 30 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता. याच कार्यक्रमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप अश्या मतदार याद्या गत महिन्यात जाहीर झाल्या आहेत . जाहीर झालेल्या मतदार याद्यांवर हरकती मागविण्याची प्रक्रिया बाजार समित्यांमध्ये सुरू आहे. याच हरकतींवर सुनावणी होऊन डिसेंबर अखेर, शेवटची मतदार यादी जाहीर होऊन अर्ज दाखल केले जाणार होते. त्यासाठी तालुक्या तालुक्यांमध्ये राजकीय हालचाली सुरू झालेल्या होत्या. असे असताना देखील राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा थांबवले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून 1 नोव्हेंबर 2022 च्या पत्रान्वये राज्यातील एकूण सात हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ना जाहीर केलेल्या ग्रामपंचात कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे, नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये, असे पत्रात नमूद केले आहे. याबाबत, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका ह्या दिनांक . 15 मार्च 2023 पर्यंत थांबवण्यात आल्याचे म्हटले आहे.
■ यामध्ये जिल्ह्यातील14 समित्यांचा म्हणजे नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी या बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला होता .
आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा