Miraj West : मिरज पश्चिम भागातून ढोबळी मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

Last Updated on December 9, 2022 by Jyoti S.

Miraj West : ढोबळी मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

दराची अनिश्चितता, रोगराईत वाढ, खते औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढीचा परिणाम समडोळी बाजारपेठेमधील दरा एक नसल्याने , हवामानातील इतर बदल, निसर्गाचा असमतोल, रोगराईत वाढ, खते औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे मिरज पश्चिम भागात जास्त पैसे मिळवून देणारे ढबू मिरचीचे पीक बंद होण्याच्या मार्गावर आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीकाई गावांमध्ये म्हणजेच समडोळी, दुधगाव, तुंग, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी भागात उत्पादित होणाऱ्या ढबू मिरचिला(Miraj West ) प्रतिकिलो ५० रुपयांपासून ते २०० रुपये पर्यंत दर मिळत होता.

जर अवाक वाढली तर तो ३० रुपयांपासून शंभरापर्यंत खाली येत असे. तसेच आजकाल प्रत्येक वेळेस एकच भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पिकाच्या जमिनी नापीक बनण्याचा धोका जास्त निर्माण झाला आहे. या भागामध्ये ढबू मिरची बरोबरच टमाटे, वांगी, गवारी, भेंडी ही भाजीपाल्याची नगदी पैसा मिळवून देणारी पिकेही लोक घेत आहेत

सध्या गुंतवणूक व मेहनतीच्या तुलनेत बाजारपेठेत अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी जेसीबी लावून भाजीपाल्याची पिके नष्ट करण्याचा सपाटा चालू ठेवला आहे.
ढबू मिरचीचे दर तर खूपच पडले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा हैदराबाद व अन्य राज्यात जाणान्य ढबू मिरचीत घट झाली आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

कर्जबाजारी होण्याची वेळ

कोरोनाच्या संकटात आर्थिक उलाढाल थांबली
परंतु नगदी पिके असणाऱ्या भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये लॉकडाऊन च्या काळात वाढ झाली होती. त्याचवेळी दळणवळणावर कठोर निर्बंध घातले गेल्याने भाजीपाला सडून गेला. त्यानंतर अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसला. दर नसल्याने गुंतवणूक वाया गेली. परिणामी या भाजीपाला उत्पादकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे.

क्षेत्र का घटले?


लोकांचे आलटून पालटून पीक घेण्याऐवजी एकच भाजीपाल्याचे पीक लावण्याकडे कल आहे.Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !
रासायनिक खते, औषधांचा मारा, पाण्याचा अतिरिक्त वापर यामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे .


आवक वाढल्याने दरात होणारी मोठी घट

पूर्वी या भागात(Miraj West ) ढबूचे विक्रमी उत्पादन होत असे. बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. तथापि, महापूर, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारख्या संकटांनी उत्पादनावर परिणाम झाला. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना बसला. दलाल-विक्रेत्यांची मात्र चांदी झाली.