Nashik Market Committee: पावसामुळे आवक घटल्याने या फळभाज्या महागल्या

Last Updated on July 24, 2023 by Jyoti Shinde

Nashik Market Committee

नाशिक बाजार समिती : कारली, वांगी, ढोबळी मिरची महागली.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील उभे पीक काही प्रमाणात खराब झाल्याने फळभाज्या मालाची आवक घटली आहे. काही दिवसांपूर्वी पालेभाज्या महागल्या होत्या तर आता सर्वच फळभाज्या तेजीत आल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.Nashik Market Committee

बाजार समितीत टोमॅटो, वांगी, कारली, ढोबळी मिरची तसेच भोपळा यासह इतर फळभाज्या विक्रीला दाखल होत असल्या तरी त्या खरेदीसाठी मात्र ग्राहकांना हात गाडीवर दाम दुप्पट पैसे मोजावे खिशाचा विचार करावा लागत आहे. नाशिक ऋषी रान बाजार समिती विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटो मालाचे दर शंभर रुपये किलोपर्यंत असून आता कारले, वांगी, ढोबळी मिरची तसेच काकडी मालाला प्रति किलो ५० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई व मुंबई उपनगरात फळभाज्या माल रवाना केला जातो महागलेला सर्वच फळभाज्या माल नाशिकहून मुंबईला पाठविला तरी त्या मालाचे पैसे होतील याची हमी नसल्याने काही व्यापाऱ्यांनी कमी प्रमाणात माल खरेदी करणे सुरू केले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

हेही वाचा: Tractor Trolley Subsidy : ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी 50 टक्के सबसिडी, याप्रमाणे अर्ज करा.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या वांगी ४५० रुपये प्रति (१५ किलो जाळी), भोपळा (१८ नग) ६०० रुपये, कारले (१५ किलो जाळी) ४५० रुपये तर टोनली मिरची 193 किलो 400 रुपये दर मिळत आहे.Nashik Market Committee

टोमॅटो दर टिकून असून बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलो प्रति जाळीला १,८०० ते २,००० रुपये बाजारभाव टिकून आहे. सर्वसामान्य ग्राहकांना रस्त्यावर हातगाडीवर हातगाडीवर कोणत्याही फळभाज्या खरेदीसाठी ग्राहकांना पावशेर भाजीसाठी किमान 30 रुपये मोजावे लागतात. भाजीपाला घेण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतात.हातगाडीवर कोणत्याही फळभाज्या खरेदीसाठी * ग्राहकांना पावशेर भाजीसाठी किमान 30 रुपये मोजावे लागतात.


कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव तेजीत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे फळभाज्या ओल्या खराब झाल्यामुळे आवक घटली आहे. परिणामी सर्वच फळभाज्या बाजारभाव तेजीत आले आहेत. फळभाज्या दर तेजीत असल्याने शेतमाल इतर ठिकाणी बाजारपेठेत पाठविल्यानंतर त्या मालाचे पैसे होतील की नाही याची कोणतीही शाश्वती नसल्याने फळभाज्या माल खरेदी करताना व्यापाऱ्यांनादेखील खिशाचा विचार करावा लागत आहे.Nashik Market Committee

हेही वाचा: Food inflation:केवळ टोमॅटोच नाही तर खाण्यापिण्याच्या या वस्तूही महागल्या, जाणून घ्या कितीने वाढले दर