
Last Updated on December 6, 2022 by Taluka Post
तीन लाख गुंतवून १३ हजारांचे उत्पादन; शेती धोक्यात आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) कुठल्याही व्यवसायात तोटा झाल्यास ‘लाखाचे बारा हजार झाले’ असे म्हटले जाते; परंतु तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील एका शेतकऱ्याला तीन लाखांची गुंतवणूक करून केवळ तेरा हजार रुपये पदरात पडल्यामुळे लाखाचे बारा नव्हे, तर चारच हजार झाले म्हणण्याची वेळ आली आहे.
बाजारात केवळ प्रति किलो पाच ते सहा रुपयांचा भाव मिळू लागल्याने टोमॅटो शेती करणारे शेतकरी धोक्यात आले आहे. धोत्री शिवारात शिवाजी साठे यांनी ३ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनाचा आधार घेत टोमॅटो रोपाची लागवड सप्टेंबर महिन्यात केली होती. त्यावर त्यांनी ३ लाखांचा खर्च केला.मात्र, उत्पादित केलेले टोमॅटो विक्रीसाठी बाजारात जाणार तोच बाजार भावात घसरण झाली. ३० ते ४० रुपये प्रति किलो मिळणारा भाव अचानक ५ ते ६ रुपयांवर येऊन बसला . त्यामुळे साठे यांना फक्त १३ हजारांचे उत्पादन पदरात पडले.
मार्केट मध्ये योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली . लागवडीचा खर्चही(खर्च) पदरात पडतो की नाही, याचा भरवसा पण नाही. आता जे राहिले ते टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.शिवाजी साठे, शेतकरी, धोत्री