आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

Last Updated on December 4, 2022 by Taluka Post

जीएसआय, नागपूरच्या भूवैज्ञानिकांनी दाखविली दिशा

नागपूर सौरऊर्जा, पवनऊर्जा, जलऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आता भू-औष्णिक (जीओथर्मल) उर्जेची भर पडणार आहे. भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला असून, वैज्ञानिकांना दिल्ली येथे ५ किलोवॉट वीज तयार करण्यात यश आले आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे जगातील भू-औष्णिक ऊर्जा तयार करणाऱ्या देशात आता भारताचेही नाव नोंदविले जाणार आहे.

जमिनीतील गरम पाण्यापासून वीजनिर्मिती करणारे उपकरण.

कुठे झाला प्रयोग?

दिल्ली येथे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्व या संस्थेत डॉ. मनमोहन कुमार व डॉ. भूपेश शर्मा यांच्या नेतृत्वात पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला.

कशी झाली सुरुवात?

जीएसआय आणि ओएनजीसीच्या संशोधकांनी देशात भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे निघणारी १०० पेक्षा अधिक • ठिकाणे शोधली आहेत, त्या उष्ण पाण्याच्या नैसर्गिक सोताद्वारे वीजनिर्मिती होऊ शकते, ही दिशा भारतीय भू सर्वेक्षण (जीएसआय) नागपूरचे संचालक व भूवैज्ञानिक डॉ. विशाल साखरे व त्यांच्या टीमने दाखविली. कोळसा मंत्रालयाने या पायलट प्रोजेक्टसाठी १.७ कोटी रुपये मंजूर केले. अडीच हजार चौरस फूट जागेत वैज्ञानिकांनी तीन वर्षांच्या अथक प्रयत्नातून ५ किलोवॉट वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. यावेळी भू-औष्णिक उर्जेपासून दोन बल्च पेटवून हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.

अशी झाली वीजनिर्मिती

पाण्याचा उष्णांक बिंटू (बॉडलिंग पॉइंट) १०० डिग्री असतो. मात्र, वैज्ञानिकांनी ६५ ते ७० डिग्री उष्ण पाण्यातून वीजनिर्मिती केली आहे. या उष्ण अयातून उष्णता (हीट) बाहेर काढण्यात आली. टर्बाईनमध्ये या उष्णतेसोबत एक विशिष्ट लिक्चिडमिश्रित करून त्याद्वारे वाफ तयार करण्यात आली. ही वाफ पुन्हा लिविचडमध्ये परिवर्तीत करण्यात आली. हे चक्र सतत सुरु ठेवत वीजनिर्मिती करण्यात आली.

यात पाच देशांची मक्तेदारी

  1. अमेरिका,आयर्लंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया व मेक्सिको.
  2. आयर्लंडमध्ये ९० टक्के गरज भू-औष्णिक उर्जेने भागविली जाते.