Last Updated on February 26, 2023 by Jyoti S.
Onion Market rates
थोडं पण महत्वाचं
कांद्याचे दर(Onion Market rates) : 1500 ते 600 रुपये दर असलेल्या कांद्याचा भाव आठ दिवसांत निम्म्यावर आला.
कांदा बाजारात दहा पोती कांदा विकल्याबद्दल शेतकऱ्याला दोन रुपयांचा धनादेश. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 पोती कांदा विक्रीसाठी एका शेतकऱ्याला केवळ दोन रुपयांचा धनादेश मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आजचे कांदा बाजार भाव इथे क्लिक करून घ्या जाणून
सोलापूर मध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची खूपच आवक वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून कांद्याच्या भावात अचानक घट झाली आहे. जानेवारीत सरासरी 1500 रुपयांनी विकला जाणारा कांदा आता 200 ते 500 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे.त्याचमुळे आता कांडा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडलेले आहे
तसेच बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये दहा गोणीला दोन रुपये दर मिळाल्याने राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्याला मिळालेली पट्टी आणि धनादेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.