
Last Updated on June 23, 2023 by Jyoti Shinde
Onion News
कांदा : भाव पडल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला आहे. परंतु, वातावरणातील बदलामुळे चाळीत ठेवलेला कांदा सडू लागला आहे.
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.
कारण कांद्याच्या(Onion News) भावात मोठी घसरण झाली आहे. भाव पडल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे चाळीत ठेवलेला कांदा सडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्याचा मोठा फटका बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
नाशिकच्या कसमेद पट्ट्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
राज्यात सातत्याने हवामान बदल होत आहेत. बदलत्या वातावरणाचा कांदा(Onion News) उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे हा कांदा जास्त प्रमाणात सडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिकच्या कसमेद पट्ट्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे.मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
थोडं पण महत्वाचं
शेतकर्यांना कांदा माफक भावाने विकण्याची वेळ आली आहे.या धक्क्यातून शेतकरी हे सावरत असतानाच आता कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.
दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक केलेली होती. गरजेच्या वेळी थोडा कांदा(Onion News) विकून पैसे मिळतील आणि संकटही दूर होईल, अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र, चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची चाळी फोडून सडलेला कांदा काढण्यासाठी चढाओढ सुरू केली. आता खरिपासाठी भांडवल मिळेल एवढ्या भावात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे(Onion News)
Comments are closed.