Last Updated on March 8, 2023 by Jyoti S.
onion Rate
थोडं पण महत्वाचं
onion Rate : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने भावात घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. करमाळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आवक वाढल्याचा फायदा घेत व्यापारी अवघ्या पाच ते सहा रुपये किलोने कांदा खरेदी करत आहेत. त्यामुळे सरकारने कांदा पिकावर प्रतिकिलो पाच रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक(onion Rate) शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळाल्यास शेतकरी आत्महत्या करतील.
हेही वाचा : Eknath shinde : राज्यातील अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी कांदा व इतर नगदी पिकांकडे वळले. पिकांचे उत्पादनही दर्जेदार आहे. शेतकरी सुखावला, मात्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
हेही वाचा: Salokha yojna 2023 : आता भाऊबंदकीचे वाद सरकार सोडवणार
यंदा कांद्याला पोषक वातावरण असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. त्यासाठी सरकारने नियोजन करणे गरजेचे होते. अतिरिक्त उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात दुप्पट झाली पाहिजे. गरज भासल्यास निर्यातीला अनुदान दिले पाहिजे. भाव स्थिर होईपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये किलो दराने अनुदान द्यावे.
हेही वाचा: Mobile Sim card : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे लगेच चेक करा आता तुमच्या मोबाईल मध्ये!!