स्वनिर्मित यंत्राद्वारे कांदा बियाणे पेरणी

Last Updated on December 6, 2022 by Taluka Post

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

ब्राह्मणगाव येथील उद्यमशील शेतकरी किशोर नामदेव खरे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड न करता स्वतः तयार केलेल्या पेरणी यंत्राने दोन एकर क्षेत्रावर कांदा बियाणे पेरणी केली आहे. गेल्या वर्षीही त्यांनी कांदा पेरणी करून पैशांची बचत केली होती. शेतीपयोगी लहान-मोठी यंत्रे ते स्वतः तयार करून शेतात वापरतात. या पेरणी यंत्रामुळे वेळेची बचत, उत्पादन कालावधी कमी, फवारण्या कमी, तसेच शेतात तण कमी येत असल्याने मजुरी, औषधांची गरज कमी लागते, असे शेतकरी किशोर खरे यांनी सांगितले.