Last Updated on January 2, 2023 by Jyoti S.
Organic jaggery and mole : गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ; दर वाढण्याआधीच ‘गोड गोड बोला’
नाशिक (Organic Jaggery & Mole): अवकाळी पावसाने तिळाच्या(mole) उत्पादनावर परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात तिळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून १६०- १८० रुपये किलो दराने मिळणारे तीळ(mole rate) थेट २४० ते २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यात मकर संक्रांतीचा सण जवळ येत असल्याने तिळाच्या दरात अजूनही पाच- दहा रुपयांची वाढ होण्याचा अंदाज व्यापारी वर्गात व्यक्त केला जात आहे.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
तिळाबरोबरच गुळाचे(organic jaggery) दरही थोड्याफार प्रमाणात वाढले असून सध्या ७० ८० रुपये किलो या दराने सेंद्रीय गूळ(Organic jaggery and mole) मिळत आहे. तर विविध नामांकित कंपन्यांच्या गूळ पावडरचा दर १२० पासून १४० रुपये किलोपर्यंत आहे.
आपल्याकडे गुजरातमधून सर्वाधिक तिळाची आवक होत असते. सध्या तेथेच मालाची कमतरता असल्याने तिळाच्या दरांवर परिणाम झाला आहे. आणखी दर वाढण्यापूर्वीच या वस्तुंची खरेदी करणे ग्राहकांच्या हिताचे ठरणार आहे.
गुजराती तीळ २४० रुपये किलो
नाशिकमध्ये काही प्रमाणात मध्य प्रदेशातून तर जास्त प्रमाणात गुजरातमधून तिळाची(Organic jaggery and mole) आवक होत असते. यावर्षीच्या पावसामुळे तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला.
सेंद्रिय गूळ ८० रुपयांवर
केमिकलयुक्त गूळ, सेंद्रीय गूळ, गूळ पावडर अशा वेगवेगळ्या स्वरूपात बाजारात गूळ उपलब्ध आहे. भेलीच्या सेंद्रीय गुळासाठी किलोला ८० रुपये लागतात तर पावडर, केमिकलयुक्त गूळ यांचे दर वेगवेगळे आहेत.
साखरही ४२ रुपयांवर
संक्रांतीच्या काळात तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व असले तरी काही ठिकाणी साखरेचाही वापर केला जातो. सध्या साखरेचे दर ४०- ४२ रुपये किलोपर्यंत किरकोळ बाजारात साखर विकली जात आहे.
शेतकऱ्यांची तिळाकडे पाठ
जिल्ह्याच्या आदिवासी भागात एकेकाळी तिळाची चांगली लागवड व्हायची; पण या भागातही शेतकरी नगदी पिकांकडे वळल्याने तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा: Today’s rice market price | आजचे तांदुळ बाजार भाव