Panchavati nashik market : बळीराजाने जनावरांसाठी शेतात सोडला टमाटा !

Last Updated on December 26, 2022 by Jyoti S.

Panchavati nashik market: बाजारभाव घसरले शेतकरी हवालदिल

Panchavati nashik market: यंदाच्या वर्षी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी टमाट्याची मोठचा प्रमाणात लागवड केली खरी; मात्र यंदा टमाट्याचे भरगच्च उत्पादन झाल्याने बाजारसमितीत मोठी आवक झाली. यामुळे बाजारभाव पूर्णतः कोसळले आहेत. प्रति क्रेट भाडे २० रुपये अन् २० किलो जाळीला मिळतात ३० रुपये त्यामुळे लागवड खर्च तर सोडाच वाहतूक खर्चही सुटत नसल्याने दिंडोरी तालुक्यातील अनेक खेड्यामधील शेतकऱ्यांना टमाट्याचा खुडा बंद करत उभे पीक जनावरांना खाण्यासाठी सोडून दिल्याचे चित्र आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत टोमॅटोच्या २० किलो वजनाच्या जाळीला किमान ८० ते १२० रुपये बाजारभाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. दोन ते तीन रुपये किलो दराने टमाट्याचा माल विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्च गाडी भाडेही सुटत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला

टमाटा, मालाला पोषक हवामान असल्याने टोमॅटो मालांचे उत्पादन वाढले मात्र टमाटा परराज्य व इतर बाजारसमितीत पाठविणे बंद असल्याने उठाव झाला नाही. चांगल्या प्रतीचा माल आणल्यानंतरसुद्धा टमाटा उत्पादक शेतकन्यांना पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. यामुळे दिंडोरी तालुक्यातील राशेगाव, ननाशी गोळशी, चाचडगाव, महाजे, शिवपाडा, बागीचा पाडा, बनारे, खिराड, चौसाळे, भागातील काही शेतकरी बांधवांनी तर टोमॅटो मालाची विक्री थांबवून टोमॅटो पीक जनावरांसाठी सोडले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकाची नांगरणी करून गव्हाची पेरणी सुरू केली आहे.

हेही वाचा: Compensation: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी हेक्टरी ४५ हजार रुपये जाहीर

म्हणून शेतकरी सापडला अडचणीत!

चार महिन्यांपूर्वी साधारणपणे ऑगस्टमध्ये नवीन टमाटा माल दाखल झाला. त्यावेळी प्रति जाळीला सातशे आठशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला होता; मात्र अवघ्या काही दिवसानंतर परबाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाला त्यामुळे दुहेरी भाव एकेरी आला तेव्हापासून बाजारभाव घसरले आणि शेतकरी अर्थिक अडचणीत सापडले.

यंदा टमाट्याची लागवड केली. चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या एका जाळीला ३० रुपये असा बाजारभाव मिळाला, त्यात २० रुपये गाडी भाडे गेले. लागवड खर्च, गाडी भाडे आणि मजुरीसुद्धा सुटत नसल्याने यदा टमाटा पिकाने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत(Panchavati nashik market) आणले आहे. बाजार नसल्याने टमाट्याचा खुडा थांबवून उभे पीक जनावरांकरिता सोडून दिले.

Comments are closed.