
Last Updated on April 21, 2023 by Jyoti S.
Panjabrao Dakh
थोडं पण महत्वाचं
Panjabrao Dakh : दि. 24 एप्रिल ते 2 मे पर्यंत सर्वांनी वीज, गारपीट, वारा, स्वत:ची, पिके, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी.
ज्या लोकांनी कधीही गारपीट कशी दिसते हे पाहिले नाही त्यांच्यासाठी हा पंजाब डखचा इशारा
पूर्व काय सूचना त्या खालीलप्रमाणे पहा
राज्यातील प्रत्येकाने 24 एप्रिल ते 2 मे असे दहा दिवस वीज, वारा, पाऊस आणि गारपिटीपासून आपल्या पाळीव प्राण्यांची, हळद, इतर पिकांची काळजी घ्यावी, कारण 24 एप्रिल ते 2 मे या दहा दिवस राज्यात पाऊस पडेल. .
पूर्वविदर्भ दि. 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 तारखेला काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी वारे तर काही ठिकाणी गारपीट होईल.
उत्तर महाराष्ट्र दि. 22, 26, 27, 28, 29, 30 या तारखेला वारा, गारपीट आणि पाऊस पडेल.
मराठवाडा दि. 25, 26, 28, 29, 30 रोजी गारपीट, वारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडेल, अंश बदलत राहतील.
दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात 26, 27, 28, 29, 30 रोजी गारपीट, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडेल.
पश्चिम-विदर्भ- 25, 26, 26, 28, 29, 30 रोजी काही भागात गारपीट होईल. जिथे वारा असेल तिथे पाऊस पडेल.
शेवटी हा अंदाजच आहे . वारा बदलताच वेळ हि बदलते , तसेच ठिकाण, दिशा बदलते कळली पाहिजे.
Comments are closed.