Pik vima 2023: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्यासाठी ३ दिवसांची मुदतवाढ

Last Updated on July 31, 2023 by Jyoti Shinde

Pik vima 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजना: प्रधानमंत्री पिक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवडीपासून काढणीपर्यंत पीक नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी एक वरदान आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

Pik vima 2023: कर्जदार, नॉन-क्रेडिटर्स, कुळ किंवा भाडेकरू शेतकरी रुपये नाममात्र दराने पीक विमा घेऊ शकतात. पीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती, ती आता ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.Pik vima 2023

राज्याच्या काही भागात अत्यल्प पाऊस झाला असून पिकांच्या पेरण्याही कमी झाल्या आहेत. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

उशिरा पेरणी झाल्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होऊ न शकल्याने प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.

हेही वाचा: Riksha Sanghatna : आता राज्यातील रस्त्यावर नव्या रिक्षा धावणार नाहीत,का घ्या जाणून

शेतकरी शेतीच्या कामात खूप व्यस्त आहेत. यासोबतच राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या निर्माण झाली असून, सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी शेत सोडावे लागत आहे. त्यामुळे ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे.Pik vima 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षणासाठी शेतकरी संबंधित बँक किंवा http://pmfby.gov.in आणि आप सरकार सेवा केंद्राद्वारे अर्ज करू शकतात.

या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास, त्याने विहित कालावधीत बँकेला लेखी कळवावे.

हेही वाचा : Vastu tips for home : जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल तर वास्तुचे हे नियम लक्षात ठेवा

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे उद्दिष्ट

अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पीक निकामी झाल्यास शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही उत्तम योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतमालाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.Pik vima 2023

हेही वाचा: Todays weather:राज्यात पावसाचा अंदाज! या 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट,पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती