Tuesday, February 27

PM Kisan Yojana 13th Week : पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता खात्यात जमा झाला नसेल तर,शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार,आणि ज्यांच्या खात्यात हे पैसे आले का हे ऑनलाईन इथे चेक करा

Last Updated on March 21, 2023 by Jyoti S.

PM Kisan Yojana 13th Week

पीएम किसान योजना(PM Kisan Yojana 13th Week) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जारी केला. पण जर तुमच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नाही तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana 13th Week) अंतर्गत देशातील 8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे रक्कम वितरित केली. सोमवारी पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.

रक्कम खात्यात जमा नाही झाली,

शेतकऱ्यांनी लगेच येथे तक्रार करावी

या योजनेंतर्गत एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 2,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये जमा होतात. पण जर तुमच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसेल, तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकता (PM-KISAN Scheme Complaint Number).

हेही वाचा: PM Kisan 13th Installment update : काय आता तुम्ही अजूनही पीएम किसान 13 व्या हप्त्याची यादी बघितली नाही का आताच जाऊन पहा आणि रू. 6000 चा लाभ घ्या.


मोदी सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. ही रक्कम देशभरातील शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. रक्कम न भरल्यास तक्रार दाखल करता येते.

इथे क्लिक करून यादीत तुमचे नाव पहा लगेच

खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही ते तपासा

  1. पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) तुमच्या खात्यात जमा झाला असेल पहा .
  2. त्याचा पडताळा घेण्यासाठी यासंबंधीची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
  3. त्या ठिकाणी ‘Farmers Corner’ असा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. Beneficiary Status’ या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. नवीन पेज लगेच उघडेल.
  5. लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हि माहाती द्यावी लागेल.
  6. ‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर लगेच त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील आताची स्तिती काय आहे हे दिसेल.

हेही वाचा: PM Kisan : ‘या’ लोकांना पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, बघा तुमचे नाव यादीत आहे की नाही…

Comments are closed.