Tuesday, February 27

Provide Daily Electricity to Farmers : शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्यासाठी सरकारने आखला हा मोठा प्लॅन

Last Updated on June 10, 2023 by Jyoti Shinde

Provide Daily Electricity to Farmers

Provide Daily Electricity to Farmers : शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


शेतकरी : शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी 7000 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी यासाठी सात हजार मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हायलाईट्स


विजेचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच कृषी पंपांना पुरेशी वीज मिळत नसल्याबद्दल शेतकरी नाराज आहेत. त्यामुळेच राज्य सरकार पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना वीज कशी उपलब्ध करून देता येईल यावर भर देत आहे.

हेही वाचा: Nashik Police : नाशिककर, मोबाईल हरवला! घाबरू नका, आता नाशिक पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या योजनेंतर्गत आतापर्यंत १५१३ मेगावॅट वीज खरेदी करार करण्यात आले असून, त्यापैकी ५५३ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून शेतकऱ्यांना २३० कृषी वाहिन्यांद्वारे दिवसा पंपासाठी वीज पुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच या योजनेतील क्रॉस सबसिडीचा भार कमी करून उद्योगांना स्पर्धात्मक दराने वीजपुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून सुमारे 30 हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या योजनेंतर्गत सध्या 1513 मेगावॅट वीज खरेदी करार करण्यात आला आहे. त्यापैकी ५५३ मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्पही पूर्ण झाले आहेत. सध्या राज्यातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा: New Education Policy Centre : प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन होणार हे केंद्र ; असा होणार मोठा फायदा

Comments are closed.