शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्या !

Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे महावितरणला साकडे

कळवण तालुक्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत गावठी कांदा लागवडीचे काम सुरु असते. काळात लागवड झालेल्या पिकाला पाणी देणे महत्वाचे असते. त्यामुळे महावितरण कंपनीने दिवसा लागवड सुरु असताना पुर्ण शक्तीने वीजपुरवठा करणे गरजेचे आहे.विलास रौंदळ,तालुकाध्यक्ष कांदा उत्पादक संघटन, कळवण

कळवण : शेतीसाठी होत असलेल्या वीज पुरवठ्यात सुसूत्रता नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. सध्या गावठी कांदा लागवड सुरु असल्याने शेतीसाठी दिवसा सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत पूर्ण शक्तीने वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी महावितरण कंपनीला निवेदन देऊन कळवण तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

कळवण येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कसरतीने पिकविलेल्या कोणत्याच शेतमालाला वर्षभर योग्य भाव मिळाला नाही. सध्या कधी दिवसा तर कधी रात्री वीज पुरवठा होत असन आमच्या जवळ असलेल्या जमा पुंजीतून सध्या कांदा लागवड सुरू केली आहे. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे कांद्याच्या लागवडीत मोठे नुकसान होत आहे. थंडीत रात्र जागून काढावी या आहे. तसेच तालुक्यातील सर्वच भागात हिंस्त्र प्राण्यांची दहशत आहे. त्यामुळे जीव मुठीत देण्याची वेळ आली आहे.’ दाखल घेऊन वीजता सकाळी दहा ते सायंकाळी . महावितरण कंपनीने याची सहा वाजेदरम्यान करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, कार्याध्यक्ष ओंकार पाटील, तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, योगेश पगार, व्ही. खैरनार, प्रल्हाद गुंजाळ, राजेश्वर शिरसाठ, युवराज वाघ, योगेश पाटील, ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष रामा पाटील, तुषार पाटील, रामदास पाटील, नंदू जाधव आदी उपस्थित होते.