Last Updated on December 28, 2022 by Jyoti S.
Sahyadi Angro Producer: शेतकरी कंपन्या शेतीचे चित्र बदलवू शकतात
केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा : मोहाडी येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद
केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी सह्यादी अँग्रो प्रोड्युसर(Sahyadi Angro Producer) कंपनीस भेट दिली. त्याप्रसंगी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, केंद्रीय कृषी सचिव अभिलाष लिखी. फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते आदींसह शेतकरी.
नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्या देशातील शेतीचे चित्र बदलवू शकतात. अशा मजबूत सक्षम मूल्यसाखळ्या उभ्या राहणे ही काळाची गरज आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येत शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी केले.
आहुजा यांनी मंगळवारी यांनी (दि.२७) मोहाडी मधील (ता. दिंडोरी) सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर(Sahyadi Angro Producer) कंपनीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकरी व शेती क्षेत्रातील स्टार्ट अप सुरू केलेल्या उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय कृषी सचिव (अतिरिक्त) अभिलाष लिखी, फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे आदी उपस्थित होते.हेही वाचा: सह्याद्री फार्म्स देणार तरुणांना उद्योजक होण्याचे धडे

याप्रसंगी आहुजा म्हणाले, शेतीचे प्रश्न खूप मोठे आहेत. ते सोडविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला तर खूप मोठी प्रगती साधली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. यावेळी कंपनी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सादरीकरणातून आपल्या कंपनीचा प्रवास उलगडला. दरम्यान ‘सह्याद्री’ भेटीच्या(Sahyadi Angro Producer) पहिल्या सत्रात आहुजा यांनी शेतकरी गणेश कदम यांच्या शेतास भेट देत शेतीत वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले. सह्याद्रीच्या एफपीसी इन्क्युबेशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणाची माहिती घेतली व प्रशिक्षणार्थी संचालकांचे अनुभव जाणून घेतले.