
Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उद्योजकतेचे प्रमाण वाढावे या हेतूने आम्ही या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. तरुणांणमधे उद्योजकीय कौशल्यांना वाव मिळावा, याचसाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा. विलास शिंदे, सह्याद्री फार्म्स

नाशिक : सह्याद्री फार्म्स व टाटा स्ट्राइव्ह स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्यातर्फे ‘समुदाय उद्योजकता कार्यक्रम’ अंतर्गत ‘चला उद्योजक होऊया’ या उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच नाशिक जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
समुदाय उद्योजकता कार्यक्रमाच्या प्रशिक्षण माध्यमातून माणसाला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊन आपला व्यवसाय आराखडा सादर करणे खूपच गरजेचे असते. त्याच नंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करून त्या व्यक्तीस 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणानंतर परत त्यांचे सादरीकरण पाहून त्या व्यक्तीस भांडवल उपलब्ध करून दिले जाते .

जानेवारी 2021 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या 3 बॅचमधील एकूण 61 नवउधोजकानी प्रशिक्षण घेऊन स्वतःच व्यवसाय सुरू केला आहे. ह्या कोरोनामुळे बऱ्याच लोकांना आपली नोकरी गेल्यामुळे गावी जावे लागले अशाच तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हेही वाचा:टोमॅटोच्या पिकात लावला चक्क गांजा!
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
स्थानिक व्यावसायिक संधीनुसार प्रशिक्षण
व्यवसायला अनुरूप मार्गदर्शन
पात्र प्रशिक्षणार्थीना आर्थिक सहाय्य
व्यवसायातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण
तंत्रज्ञान मार्गदर्शन