Akola : बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Akola : मान्सूनला सुरुवात होणार असल्यामुळे शेती कामे जोमाने सुरु झाली आहे. मात्र सध्या खरीप हंगामात बनावट रासायनिक खतांचा वेगाने बनावट बाजार सुरु झाला आहे. एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

खतांच्या उत्पादनात घट असताना अकोल्यातल्या आय.डी.सी क्रमांक 4 येथे बनावट खत बनवून बाजारात विक्री करुन सरकारची आणि बळीराजाची फसवणूक सुरु होती. MIDCमधील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


कारवाईदरम्यान काय काय सापडलं?

Akola : पोलिसांना गोडाऊनमध्ये मोठ्या खतांच्या कंपनीच्या बनावट खतांचे पॅकिंग आढळले. खताचे पॅकिंगसाठी नामवंत मोठ्या कंपनीचे नवीन प्लास्टिक बारदाना जप्त करण्यात आले आहे .

तसेच, पॅकिंग मशीन, बनावट रासायनिक खतांचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्रानुल्स्, खत बनविण्यासाठी वापरात येणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकूण 20 लाखांचा माल जप्त केला आहे.