Last Updated on December 13, 2022 by Jyoti S.
Schemes of State Govt:
आपल्याला शेती करायची म्हटलं, तर पाणी हवंच.. त्याशिवाय आपल्याला शेतीचा विचारही सुद्धा करता येत नाही. आपल्या शेतात विहीर किंवा बोअरवेल असणं खूप गरजेचं असून, त्यासाठी राज्य सरकारमार्फत विविध योजना सुद्धा राबवण्यात येतात. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना आपल्या जून्या विहिरीचीही दुरुस्ती करता येत नाही.. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे..
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील जुन्या विहिरीची दुरुस्ती करता यावी, यासाठी राज्य सरकारकडून खास योजना राबवली जाते. या योजनेचं नाव आहे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना(Schemes of State Govt)… या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांची मदत मिळते(Schemes of State Govt). महाडीबीटी पोर्टलमार्फत ही योजना राबवली जाते. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
योजनेसाठीच्या अटी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा ((Schemes of State Govt))लाभ अनुसूचित, एससी जात प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच मिळतो.
योजनेसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मर्यादा एक ते दीड लाखांपर्यंत.
जमिनीचा सात-बारा व आठ-‘अ’ उतारा, तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक
योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे किमान अर्धा एकर ते सहा हेक्टरपर्यंत जमीन असणं आवश्यक Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !
आवश्यक कागदपत्रे(Schemes of State Govt)
सक्षम प्राधिकारीकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
सात-बारा व आठ-अ उतारा
वार्षिक उत्पन्नाचा दाखला
लाभार्थी दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
विहीर असलेल्या जमिनीचा सर्वे/गट नंबर, नकाशा व चतुर्सीमा
विहिरीत पाणी असल्याचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा दाखला
कृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
गटविकास अधिकार्याचे शिफारस पत्र व जागेचा फोटो