Saturday, March 2

shaskiy valu vikri yojna : आता 50 टनांपर्यंत वाळू 133 रुपये प्रतिटन दराने मिळणार.

Last Updated on July 13, 2023 by Jyoti Shinde

shaskiy valu vikri yojna

नाशिक : राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणानुसार सर्व नागरिकांना एक वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर 600 रुपये प्रति ब्रास म्हणजेच 133 रुपये प्रति टन या दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळविण्यासाठी ग्राहकांना महाखनीज वेब पोर्टलवर वाळू खरेदीची मागणी नोंदवावी लागते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, एका कुटुंबाला एकावेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळेल.shaskiy valu vikri yojna

गेल्या काही वर्षांत वाळू लिलाव वेळेवर न झाल्यामुळे वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रत्येक ब्रास वाळूसाठी जास्त किंमत मोजावी लागली. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी जास्त पैसा, अवैध वाळू उत्खनन यावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे.

हेही वाचा: Gharpoch valu yojna 2023 : घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर..! 1 ब्रास वाळू अवघ्या 600 रुपयांना मिळणार, ‘या’ दिवशी लागू होणार, पाहा अटी व शर्ती..

या धोरणानुसार वाळूची गरज असलेल्या ग्राहकांना महाखनीज वेब पोर्टलवर वाळू खरेदीची मागणी करावी लागणार आहे. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंदवावी लागेल आणि त्यासाठीचे शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील.shaskiy valu vikri yojna

आगामी काळात मोबाइल अॅपद्वारे वाळूची मागणी नोंदविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.आता एका कुटुंबाला एकाच वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू इतकी मिळनार आहे.

अधिक वाळूची आवश्यकता असल्यास वाळूची मागणी वाळू मिळाल्यापासून एक महिन्यानंतर केली जाऊ शकते. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर 15 दिवसांच्या आत ग्राहकाला डेपोतून वाळू घेता येणार असून, त्याचा खर्च ग्राहकालाच करावा लागणार आहे. वाळू डेपोतून वाळूची वाहतूक करताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक राहणार आहे.

आता वाळू 600 रुपयांना मिळणार आहे. यामुळे वाळू लिलाव बंद करून डेपोतूनच वाळूची विक्री केली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि घरांच्या किमती परवडणाऱ्या दरात होण्यास मदत होईल, असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.shaskiy valu vikri yojna

Comments are closed.