Last Updated on December 20, 2022 by Taluka Post
Sinner Onion Farmer: सिन्नर मध्ये पेरणी लांबली मात्र रब्बीचे क्षेत्र वाढले ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Sinner Onion Farmer: सिन्नर यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक दिवस रब्बीसाठी वापसा नव्हता. जास्त ओलाव्यामुळे पेरणीयोग्य जमिनी असल्याने रब्बीच्या पेरण्या तालुक्यात लांबल्याचे दिसून आले. मात्र, आता यावर्षी रब्बी पेरणीच्या क्षेत्रात सुमारे ५ हजार हेक्टरने क्षेत्र वाढल्याचे आशादायी चित्र आहे.
२० हजार हेक्टरवर पेरणीचे उदिष्ट
सिन्नर तालुक्यात दरवर्षी १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड होत असते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी पेरणीचे उद्दिष्ट २० हजार हेक्टरवर ठेवण्यात आले होते. आतापर्यंत तालुक्यात १९ हजार ८३३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
सिन्नर तालुक्याला कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी दरवर्षीपेक्षा उन्हाळ कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. यावर्षी आतापर्यंत ५ हजार ६६९ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून अजून १५ जानेवारीपर्यंत कांदा लागवड सुरु असणार आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे दिसते.
गव्हाचे क्षेत्रही वाढले
यावर्षी गेल्या वर्षांच्या तुलनेने गव्हाचे क्षेत्र वाढल्याचे दिसते. यावर्षी ८ हजार ७४० हेक्टरवर शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. गव्हाच्या सोंगणीसाठी मजुरांची गरज भासत नाही. हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने सोंगणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी पसंती दिल्याचे चित्र आहे. हरभयाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येते.
‘यंदा पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे पाण्याचा साठा मुबलक आहे. रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. थंडी कमी असून ढगाळ व पावसाने वातावरणामुळे मावा आणि तुटतुड्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी.अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर
हेही वाचा: Farmers loan : मुदतीत कर्जफेड करणाऱ्यांना आठवडाभरात ५० हजार