Last Updated on January 6, 2023 by Taluka Post
Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय
उपाय
Soil fertility: जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे(soil) जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म. हे गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे(plants) पोषण आणि दीर्घकालीन अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब(Organic Curb), चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक(component) मोजले जातात. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. पीक उत्पादनासाठी जमिनीची(soil) सुपिकता महत्वाची आहे.
जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय पुढीलप्रमाणे :-
• जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे
• जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीत दिलेली अन्नद्रव्य पिकांच्या मुळांना सहज घेता येतात.
• मातीची हलवाहलव कमी करण्यासाठी शून्य किंवा कमी मशागत करावी.
• मृदसंधारण करून जमिनीची धूप टाळावी.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
• आंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य(Pulses) पिकांचा समावेश करावा.
• उताराला आडवी पेरणी करावी.
• जमिनीवर आच्छादनाचा (ऊस पाचट(Sugarcane), गव्हाचा भुसा) वापर करावा.
• पिकांचे अवशेष (पिकांचे 1/3 भाग) न जाळता जमिनीत गाडावेत.
• भर खते (शेणखत / कंपोस्ट(Compost) / गांडूळ खत), हिरवळीचे खते (बोरू, धैचा, गिरीपुष्प) यांचा नियमित वापर करावा.
• माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा द्यावी.
• जमिनीतील अति क्षाराचा निचरा करण्यासाठी चर खोदावेत.
हेही वाचा: Tomato Diseases: टोमॅटोवरील लवकर येणारा करपा नियंत्रणांसाठी,