sorghum: ज्वारीच्या क्षेत्रामध्ये आता ७६ हजार हेक्टरने घट; शेतकऱ्यांचा कल गहू, मका, हरभऱ्याकडे.

Last Updated on January 21, 2023 by Jyoti S.

sorghum: राज्यात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ज्वारीची लागवड केली जाते. त्यामध्ये रब्बीतील क्षेत्र अधिक आहे.

नाशिक : मागील वर्षांच्या तुलनेत यंदा रब्बी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात सुमारे ७६ हजार हेक्टरने घट झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू असतानाच परतीच्या पावसाला सुरुवात झाली. तसेच भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी(sorghum) गहू, मका, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

2016 ते 2021 या कालावधीत राज्यात रब्बी हंगामात ज्वारीचे सरासरी क्षेत्र 17,36,286 हेक्टर होते. त्यापैकी गतवर्षी १३,६८,३८४ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा 12,92,411 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचे क्षेत्र ७५,९७३ हेक्टर कमी आहे.

हेही वाचा: Soyabean Rate Today : सोयाबीनच्या दरात वाढ!!

राज्यात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ज्वारीची लागवड केली जाते. त्यामध्ये रब्बीतील क्षेत्र अधिक आहे. कमी पाऊस असलेल्या शुष्क प्रदेशात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, यंदा परतीचा पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहिला. त्यामुळे ज्वारीची पेरणी वेळेत होऊ शकली नाही. गेल्या चार वर्षांपासून सिंचन योजनांचे पाणी आणि चांगला पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी फळ पिके व नगदी पिकांवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

कुठे आहे घट बघा?

क्लिक करा