Last Updated on December 8, 2022 by Jyoti S.
Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !
पुणे : कृषी विभागाने तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात सुमारे ५ कोटींचे अनुदान वितरित करण्यात येणार असून, शेतकऱ्याला या योजनेतून ७५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशी सहाशे शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, एका शेततळ्यासाठी ४ ते ५ लाखांचा खर्च येत असताना ५ केवळ ७५ हजारांचे अनुदान तुटपुंजे असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. ही योजना एकत्रित अनुदानासाठी असावी, शेतकऱ्यांच्या हंगामानुसार त्याला अनुदान मिळावे तसेच जो शेततळे करेल त्याला हे अनुदान असावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात तत्कालीन भाजप-सेना सरकारच्या काळात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेततळ्यासाठी ७५ हजारांचे अनुदान देण्यात येत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने हे अनुदान ५० हजारांवर आणले. मात्र, ती योजनाही कोरोना काळात बंद पडली. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकारने ही योजना नव्या स्वरूपात आणली आहे. त्याला मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना असे नाव देण्यात आले आहे. त्यातून ७५ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. यात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण असे गट पाडण्यात आले आहे.
हे अनुदान शेततळ्याच्या प्लास्टिकच्या अस्तरीकरणाला देण्यात येणार आहे. वास्तविक शेतकऱ्याला त्यापूर्वी तळे खोदावे लागणार आहे.
मातीच्या प्रकारानुसार त्यासाठी किमान दीड ते ३ लाखांचा खर्च येतो. तर अस्तरीकरणाला किमान २ लाख रुपये खर्च करावे लागतात. एका ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराच्या शेततळ्याला सुमारे ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो. मात्र, सरकारकडून केवळ ७५ हजारांचे अनुदान मिळते. हे अनुदान डिसेंबरनंतर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी याच काळात खोदलेले तळे अनुदानासाठी पात्र असतील. वास्तविक शेततळे हे उन्हाळ्यात खोदून त्यात पावसाळ्यात पाणी साठवले जाते. त्यामुळे डिसेंबरपूर्वी खोदलेल्या शेततळ्यांना हे अनुदान मिळणार नाही.
तसेच प्रत्येक तालुक्यासाठी ठराविक लाभार्थी आहेत. त्यामुळे यातून गरजू शेतकऱ्यांना हे अनुदान मिळेलच, याची खात्री नाही. त्यामुळे ही योजना सरसकट ज्याला गरज आहे, त्याला लागू करावी, शेतकऱ्यांच्या हंगामानुसार अनुदान देण्यात यावे. तसेच खोदाई व अस्तरीकरणासाठी. एकत्रित अनुदान असावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.हेही वाचा: Solar Rooftop:फ्री मधे घरावर बसवा सोलार,आणि राहा 23 वर्ष बिलापासून मुक्त