सूर्यफूल तेलाचाही सोयाबीनवर दबाव

Last Updated on December 4, 2022 by Taluka Post

रशिया, युक्रेनकडून साठा संपवण्यासाठी विक्रीत वाढ; दरात घट

पुणे : रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा निर्यातीसाठी तोडगा निघाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढणार आहे. तसेच या दोन्ही देशांनी सध्या असलेला साठा कमी करण्यासाठी सूर्यफूल तेलाचे गाळप वाढवून दरही कमी केले आहेत. त्यामुळे सूर्यफूल तेल सोयातेलापेक्षा स्वस्त झाले, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले होते. पण मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीन तेलाचेही दर पडले होते. त्यामुळे परिस्थिती काहीशी बदलली. दोन्ही देशांच्या आक्रमक विक्रीमुळे ९ महिन्यांनंतर सूर्यफूल तेल सोयाबीन तेलापेक्षा स्वस्त झाले आहे. याचा फटका सोयातेलाला बसत आहे.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

रशिया आणि युक्रेनमध्ये जगाच्या ६० टक्के सूर्यफूल उत्पादन होते. तर सूर्यफूल तेल उत्पादनातील वाटा ७६ टक्के आहे. या देशांत सध्या मागील हंगामातील सूर्यफुलाचा मोठा साठा आहे. साठा कमी करण्यासाठी सूर्यफुलाचे गाळप वाढवले. सूर्यफूल तेलाचा निपटाऱ्यासाठी दरही कमी केले. यातून रशिया नव्या हंगामासाठी आपल्याकडील साठा कमी करत आहे. युक्रेन युद्धामुळे अडकून पडलेल्या सूर्यफूल तेलाचा निपटारा करत आहे.

सूर्यफूल तेल सोयाबीन तेलापेक्षा स्वस्त झाल्याचा फटका सोयातेलाला बसत आहे. आयातीवर अवलंबून असलेले भारत आणि युरोपियन देश येणाऱ्या काळात सोयातेलाऐवजी सूर्यफूल तेलाची खरेदी वाढविण्याची शक्यता रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे चालू वर्षात सूर्यफुलाचे दर सतत जास्त राहिले. चालू आठवड्यात सोयातेलापेक्षा सूर्यफूल तेल टनामागे १०० डॉलरने स्वस्त झाले होते. ही तफावत फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा पाहायला मिळाली. तसेच पामतेलाच्या तुलनेत सूर्यफूल तेलाच्या दरातील तफावत आता कमी झाली आहे. मागील महिन्यात पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरातील तफावत टनामागे ५०० डॉलर होती. सूर्यफूल तेल ५०० डॉलरने महाग होते. ही तफावत २५० डॉलरवर आली.

सोयातेल दर ११ टक्क्यांनी कमी

आंतरराष्ट्रीय(International)बाजारात मागील दोन दिवसांत सोयातेलाचे दर मोठ्या प्रमाणात तुटले होते. त्यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी सूर्यफूलाचे घटलेले दर, हेही एक कारण होते. त्यामुळे शुक्रवारी (ता. २) बाजार बंद झाला तेव्हा सोयातेलाचे दर ६५.१९ सेंट प्रतिपाउंडवर होते. गुरुवारी आणि शुक्रवारी सोयातेलाचे दर ११ होते. टक्क्यांनी कमी झाले होते.

घसरणीनंतर दरात पुन्हा सुधारणा

सध्या भारताला सूर्यफूल तेल स्वस्त मिळत आहे. वाहतूक, विमा आणि इतर खर्चासह भारताला सूर्यफूल तेल १ हजार ३०० डॉलर

सोयाबीचे दरही सुधारणार

सोयातेलाचे दर कमी झाल्यानंतर सोयाबीनचे दरही तुटले होते. सोयाबीनचे दर १४.७१ डॉलर प्रतिबुशेलवरून १४.२५ डॉलरपर्यंत तुटले होते; मात्र सोयातेलासर सुधारणा होत सोयाबीनचे दर पुन्हा १४.४० डॉलरवर पोहोचले होते. सोया तेलाचे दर आणखी सुधारतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोयाबीनचे दरही सुधारतील, असा अंदाज आहे.