येवला तालुक्यात विहिरींनी गाठला तळ, कांद्याला टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ!

Last Updated on December 6, 2022 by Taluka Post

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत : सिंचन सुविधा नसल्याने अडचणींत वाढ ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भाग म्हटला की डोंगराळ भाग आहे. या भागाला दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईला सुरवात होते. पण यावर्षी शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला असल्याने खरिपाच्या लाल कांद्याला टँकरने विकत पाणी घेऊन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावा लागतो आहे.

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या खरवंडी येथे विहिरींनी एकाएकी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी २५ हजार लिटरचा टँकर पाणी विकत आणावा लागत आहे. कांदा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धडपड शेतकऱ्यांना करावी लागत • आहे. तालुक्याचा पूर्व भाग म्हटला की, दरवर्षी किती पावसाळा झाला तरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये डिसेंबर ते जानेवारीपासूनच विहिरीचा उपसा होऊन जातो. शेतकऱ्यांना एका टँकरचा तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागाला कुठल्याही सिंचन सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच आशावादी राहूनच आपल्या शेतात राबराब कष्ट करावे लागते. कितीही पाऊस झाला तरी पाणीटंचाई दरवर्षी ही पाचवीलाच पुजलेली आहे. खरवड़ी हा भाग डोंगराळ असल्याने पाणी सर्वत्र वाहून जाते. त्यामुळे शासनाने बऱ्याच ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेऊन या भागाला ठिकठिकाणी छोटे-मोठे नाले, बंधारे करून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी थोपविल्यास ते पाणी जमिनीत मुरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ सकती शेतक-यांच्या खांदा शकतो शेतकऱ्यांच्या कांदा पिकासाठी आतापर्यंत एक एकरासाठी ५० हजार रुपये जास्त खर्च होत आहे. त्यात आता पुन्हा पाणी कमी पडले असल्याने टेंकर पाणी विकत घेऊन असल्याने टँकर पाणी विकत शेतकऱ्यांना पुन्हा आणखी आर्थिक संकट ओढवले आहे.

येऊ शकल्याने लाल कांदा बाजारात हजार दर मिळत आहे, उन्हाळ कांदा शेतकयांनी टिकवून धरला पण कांदा टिकून ही त्यातुन खर्च देखील वसूल

खतांच्या किमतीत वाढ

शेतकऱ्यांना मध्यंतरी अस्मानी संकट व आता पाणी आटले असल्याने पीक परिपक्च होण्याच्या मार्गावर असतानाच सुकून जाण्याची भीती आहे.

अशा अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी शेतकऱ्यांना आपला संसाराचा गाडा चालवताना मोठ्या प्रमाणावर संकट येत आहे. रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

आता सध्या लाल कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपये भाव आहे. पिकांना पाणी देण्यासाठी टँकरचा | आधार घ्यावा लागतो आहे, पंधरा दिवसांनी कांदा काढणीस येईल तोपर्यंत बाजार भाव काय राहतो याचा नेम नाही. मात्र, आज रोजी टँकरने विकत पाणी घेऊन पीक वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.