बटाट्याच्या रोपाला लागली टोमॅटो अन् वांगी

Last Updated on December 6, 2022 by Taluka Post

चंडीगड : बटाट्याच्या रोपाला टोमॅटो व वांगी लगडू शकतात का? हे ऐकायला विचित्र वाटेल; पण हिमाचल प्रदेशातील परविंदर सिंग या शेतकऱ्याने ते खरे करून दाखवले आहे. कलम तंत्राद्वारे एकाच रोपातून तीन प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे नवीन तंत्र त्यांनी शोधून काढले असून, दीड महिन्याच्या मेहनतीनंतर ते आता बटाट्याच्या रोपावर टोमॅटो आणि वांग्याचे पीक घेत आहेत.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हमीरपूरच्या लहल्दी गावचे रहिवासी असलेल्या परविंदर सिंग यांच्या मते, कमी जागेत अधिक भाज्यांचे उत्पादन करण्यासाठी हे तंत्र प्रभावी ठरेल. लोकांना कुंडीतील एकाच रोपातून तीन प्रकारच्या भाज्या मिळतील.

काय आहे तंत्र?

या तंत्रात एका झाडाची ऊती दुसऱ्या वनस्पतीच्या ऊतीमध्ये घातली जाते, ज्यामुळे दोन्ही वनस्पतींचे संवहनी ऊतक एकत्र मिसळले जातात. या पद्धतीमध्ये अलैंगिक पुनरुत्पादनाद्वारे झाडे तयार केली जातात आणि एका रोपातून अतिशय कमी जागेत तीन प्रकारच्या भाज्या मिळू शकतात, असे परविंदर सिंग म्हणाले.