
Last Updated on December 4, 2022 by Taluka Post
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
अकोला : पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास दिवसा वीजपुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश म्हटल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भाला मात्र यातून वगळण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये निर्णयाविरुद्ध नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सध्या रब्बी सिंचनासाठी शेतकऱ्यांची सर्वत्र लगबग सुरू आहे. या भागात | आठवड्यात काही वेळ दिवसा वीजपुरवठा आणि काही वेळ रात्रीला वीज मिळते. अनेकदा मध्यरात्रीच्या सुमारास वीज सुरू होते. ही वेळ साधण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. सध्या या भागात आठ तास वीजपुरवठा केला जातो. मात्र यातही अनेक वेळा विविध कारणांनी वीज गायब राहते. त्यामुळे सिंचनाचे व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. या प्रकारांमुळे शेतकरी सर्वत्र त्रस्त झाले आहेत. अशातच आता शासनाने पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १२ तासांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जाहीर झाल्यापासून या जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांमधून २ तास सलग वीजपुरवठा देण्याची मागणी होत आहे.