
Last Updated on October 5, 2023 by Jyoti Shinde
Bhajipala mahagla
नाशिक: यावर्षी अडीच महिने पावसाने दांडी मारल्याने पालेभाज्याची आवक कमी व मागणी अधिक झाल्याने यंदा पितृपक्षावर महागाईचे सावट आहे. काही दिवसांपूर्वी १० ते २० रुपये पाव मिळणारी भाजी तब्बल २५ ते ३० रुपयांपर्यंत विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्दिक फटका बसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा मार्केट बंद ठेवल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.Bhajipala mahagla
तर पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना भाजीपाला पिकविणे शक्य झाले नाही. त्यामुळे हल्ली भाज्या महागल्या आहेत.
भाजी आधी १० ते २० रुपये किलो दराने विकली जात होती; परंतु सध्या बाजारात २० ते २५ रुपये पाव किलो विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीकडून आता मोजकाच भाजीपाला खरेदी केला जात आहे.Bhajipala mahagla
पितृपक्षामध्ये पितरांना नैदेद्य दाखविण्यासाठी विविध प्रकारच्य भाज्या लागत असतात. मात्र आवक मी असल्यामुळे दर वाढलेले दिसून येत आहेत.
भाज्यांचा वाटाही महागला
पितृपक्षानिमित्त भेंडी, गवार, गिलके, दोडके, गंगाफळ अशा विविध मिश्रित भाज्यांचे नैवेद्य दाखविले जातात. त्यासाठी बाजारात पाव व अर्धा किलोचा वाटा २० ते ३० रुपयांनी विकला जात आहे. भाज्या महाग असल्या तरी मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. पाऊसही कमी जास्त प्रमाणात असून उत्पादन कमी आहे. मागे पितृपक्ष असल्याने भाज्यांना मागणी जास्त होती.Bhajipala mahagla
