Effect of price hike on Ginger Garlic Chili:आले, लसूण,मिरचीवर भाववाढीचा परिणाम; टोमॅटोला मोठी तेजी

Last Updated on July 4, 2023 by Jyoti Shinde

Effect of price hike on Ginger Garlic Chili

नाशिक : पाऊस सुरू झाल्यापासून भाज्यांची आवक सातत्याने घटत आहे. मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्याने बाजारभाव वाढत आहेत. किरकोळ बाजारात लसूण, आले, वाटाणा 200 वर पोहोचला आहे. टोमॅटोचे दरही सातत्याने वाढू लागले आहेत. साहजिकच त्याचा परिणाम ग्राहकांवरही होऊ लागला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 531 वाहनांतून 2120 टन भाजीपाला आणण्यात आला. यामध्ये 3 लाख 59 हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मागणीच्या तुलनेत आवक सुमारे 500 टनांनी कमी होत आहे. पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने दरही वाढले आहेत. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात फरसाबी 50 ते 60 रुपये किलोने विकली जात होती. सोमवारी तो 70 रुपयांवरून 75 रुपयांवर पोहोचला. दोडका 25 ते 30 ते 30 ते 36 रुपये, टोमॅटो 25 ते 44 ते 40 ते 60 रुपये, लसूण 35 ते 65 ते 45 ते 75 रुपये, हिरवी मिरची 40 ते 50 ते 60 ते 80 रुपये दर आहे.Effect of price hike on Ginger Garlic Chili

घाऊक बाजारात आणलेल्या भाजीपाल्यातून खराब माल काढावा लागतो. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारात लसूण 20 रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटोचे दरही 100 ते 120 रुपयांवर पोहोचले आहेत.

हेही वाचा: Todays weather:संपूर्ण देशामध्ये मान्सून दाखल! ‘या’ भागामध्ये पुढील 5 दिवस पावसाचा जोरदार इशारा,हवामान अंदाज पहा

आवक सुरळीत होईपर्यंत आता बाजारामध्ये कायम तेजी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. कांद्याच्या दरात सुधारणा बाजार समिती मध्ये कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.जून महिन्यात कांद्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 9 ते 13 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्याचा भाव आता 10 ते 15 रुपयांवर गेला आहे. किरकोळ बाजारात कांदा 25 ते 30 रुपये किलोने विकला जात आहे.Effect of price hike on Ginger Garlic Chili

हेही वाचा: Hill station:महाराष्ट्रातील आशिया खंडातील हे एकमेव हिल स्टेशन! जिथे वाहनाला परवानगी नाही.