Last Updated on January 5, 2023 by Jyoti S.
Grape season: युरोपियन देशांमध्ये मिळतोय १४० रुपये किलोचा दर
Table of Contents
नाशिक(nashik) : रेंगाळलेल्या पावसामुळे यावर्षी द्राक्ष हंगाम उशिरा सुरु झाल्याने अद्याप पुरेसा माल बाजारात आलेला नाही. जे काही थोडे प्लॉट सुरु झाले आहेत त्यातही अद्याप साखरेचे प्रमाण कमी आहे. शेतकऱ्यांनी कमी साखरेचा माल बाजारात आणू नये अन्यथा परदेशी बाजारपेठेत भारतीय मालाला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठे आहे. यावर्षी परतीचा पाऊस अधिक काळ रेंगाळल्याने द्राक्ष बागांच्या छाटणी वेळेवर होण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या उशिरा छाटणी झाल्याने यावर्षी फळधारणा उशिराने झाली ज्या काळ्या व्हरायटी आहेत त्यामध्ये साखर उतरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप तिचे प्रमाण कमी आहे.
सध्या युरोपात(Europe) जाणाऱ्या द्राक्षाला(Grape season) १३० – १४० रुपये किलोचा दर मिळत असल्याने अनेकांना माल पाठविण्याची घाई झाली आहे मात्र यासाठी कमी साखरेचा माल माल पाठविण्याची घाई करणे योग्य ठरणारे नाही.
सध्या माल कमी असल्यामुळे दर चांगला मिळत आहे पण माजे वाढल्यानंतर दर कमी होण्याचा अंदाज असल्याने काही उत्पादकांकडून माल खुडण्याची घाई केली जात असल्याचं दिसून येत आहे .
भारतीय बाजार पेठेत द्राक्ष(Europe) विकण्यासाठी ७ ते १८ ब्रिज साखरेचे प्रमाण आवश्यक आहे. तर युरोपियन देशांमध्ये हेच प्रमाण १५ ब्रिज पर्यंत आवश्यक असते.
हेही वाचा: Today’s grapes market rates | आजचे द्राक्ष बाजार भाव
■ या देशांमधून अनेक निर्यातदारांना ऑर्डर मिळू लागल्या आहेत मात्र साखरेचे प्रमाण कमी असल्यानें निर्यातदारांना पुरेसा माल मिळत नाही. कमी साखरेच्या मालाची ही खुडणी करण्यास सुरुवात झाली आहे .
■ चवीला थोडी अंबट लागणारी ही द्राक्ष जर परदेशात गेल्यास बाजारपेठेत भारतीय मालाला फटका बसण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.