
Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.
एकाच दिवशी पाच हजार क्विंटल आवक
लासलगाव : कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश पाणी आले आहे. गेल्या काही महिन्याभरापासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी झाल्याने आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी (दि.५) उन्हाळी कांद्याची अंदाजे ५ हजार क्विंटल आवक झाली, तर बाजारभाव कमीत कमी ५०० जास्तीत जास्त १२५२ तर सरासरी ९७० रुपये प्रति क्विंटल इतके राहिले.दिवसेंदिवस उन्हाळी कांद्याला बाजार समितीत आवक कमी होत चाललेली असताना भावही कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी निराश झाला आहे. सध्याचा काळात नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे. आधी साठवण केलेल्या कांद्याला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. दिवाळीनंतर मात्र बाजारात कांद्याचा भाव वाढला होता. तेव्हा तो सरासरी २००० ते २९०० रुपयांपर्यंत विकला गेला.
मात्र काही दिवसानंतर चित्र बदलले. भाव कमी होत गेला आणि त्याच प्रमाणात आवकही पूर्णपणे घटली. दिवाळीनंतर तेजीत आलेल्या बाजारात कांद्याच्या भावात गेल्या १५ दिवसांपासून १००० ते १७०० रुपयांनी घसरण झाली आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
मनमाडला ३०० रुपयांनी घसरण
मनमाड आवक कमी असूनदेखील कांद्याचे भाव सतत कोसळत आहेत. गेल्या महिनाभरापासून बाजारपेठेत कांद्याच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापेक्षा सोमवारी (दि.५) लाल कांदा ५००, तर उन्हाळी कांदा ३०० रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांनी चिता व्यक्त केली आहे.
आता मात्र जुन्या कांद्याला मागणी कमी आहे आणि भावही कमी आहे. ग्राहक नवीन कांद्याला पसंती देतात. त्यामुळे कांद्याचे भाव आणि त्यांची विक्री मंदावली गेली आहे. आता नवीन लाल कांद्याची बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे. –नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती
Comments are closed.