Last Updated on January 3, 2023 by Jyoti S.
Vegetables price increase: पालेभाज्यांच्या दरात वाढ कोथिंबीर जुडी २० ते ४० रुपये
नाशिक(Nashik) गेल्या आठवडयात कोलमडलेले भाज्यांचे भावात मागील दोन दिवसांपासून वाढ झाली असल्याने स्वयंपाकघरातील महिलांचे बजेट पुन्हा कोलमडणार आहे.
आहे. काही दिवसांपासून आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भावात घसरण झाली होती. जनावरांच्या चाऱ्यापेक्षाही भाजीपाला स्वस्त झाला होता. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे (Vegetables price increase) दरात पुन्हा वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी १० रुपयांस असलेली मेथी, शेपू, पालक, कांदापात, कोथिंबीर जुडी आवक कमी झाल्याने २० ते ४० रुपयांना झाली आहे. मागील महिन्यांत आवक कमी झाल्याने पालेभाज्यांचे दर घसरल्याने महिलांचे स्वयंपाकघरातील बजेट स्थिर झाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण होते. आता आवक पुन्हा कमी झाल्याने पालेभाज्यांचे दरात वाढ झाली असून, महिलांचे स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा कोलमडणार आहे.
असे आहेत बाजारात पालेभाज्यांचे दर(Vegetables price increase)…..
मेथी, कांदापात, तांदूळका ३० प्रति जुडी, पालक, शेपू २० रुपये प्रति जुड़ी, कोथिंबीर ४० रुपये प्रति जुड़ी, लसून १० रुपये प्रति जुडी, भेंडी, तोंडले, वांगे, दोडके ८० रुपये प्रति किलो, सिमला, गिलके, वाल, काकडी ६० रुपये प्रति किलो, टमाटे ३० रुपये प्रति किलो, गावठी गवार १६० रुपये किलो
हेही वाचा: Vegetables Rates Today | आजचे भाजीपाला बाजार भाव
कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाली असल्याने परिणामी किरकोळ बाजारात गेल्या दोन दिवसांपासून पालेभाज्यांचे भावात वाढ झाली आहे. आवक अशीच कमी झाल्यास भावात आणखी वाढू होऊ शकते. पालेभाज्यांचे दर कमी होण्यासाठी साधारणतः महिनाभराचा कालावधी लागू शकतो.