Indira Gandhi National Old Pension Scheme: वृद्धापकाळात आर्थिक मदत शोधत आहात? या योजना तुमच्यासाठी ठरतील उपयुक्त
Indira Gandhi National Old Pension Scheme
नाशिक : इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ही भारत सरकारची वृद्धापकाळ पेन्शन योजना आहे. ही योजना भारतातील गरीब वृद्धांसाठी आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या पाच उप-योजनांपैकी एक आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक IGNOAPS योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत वृद्धांना मासिक पेन्शन दिली जाते. ही योजना पेन्शनची रक्कम, आर्थिक स्थिती आणि वयानुसार दिली जाते. या योजनेचा सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे की 60 वर्षांनंतर वृद्ध व्यक्तीला आर्थिक मदत मिळू शकते. या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन दिली जाते.
६० ते ७९ वयोग...