
Last Updated on November 25, 2022 by Jyoti S.
आधीच महागाईमध्ये होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची आणखी एक चिंता अत्यंत वाढवणारी आहे.
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरनंतर आता घरगुती वापरान्यात वीज सुद्धा महागणार आहे. राज्यात विजेच्या दरात किमान 60 पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे असे सांगण्यात आले. त्याचमुळे सर्वसामान्याचे वीज बिल हे किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोळसाटंचाई मुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, आणि बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी पैशाचे अनुदान अशा अनेक कारणांमुळे ‘महावितरनाचा वीज खरेदी खर्च खूप वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजेच्या दरात वाढ 200 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
याचा आधी राज्य सरकारने राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टाक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता परत नोव्हेंबर महिन्यात वाढ होणार आहे असे सांगण्यात आले आहे. या दरम्यान, वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने हे 1500 कोटी रुपये राखीव ठेवलेले होते. मात्र, तोच निधी 2021 मध्येच संपला असल्याची माहिती आलेली आहे.. त्यामुळे महावितरनाणे 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. .
या काळात , वीजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून फक्त20 टक्के कोळसा पुरवण्यात आलेला होता. त्याचमुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला होता..त्यासाठी सरकारला 20 हजार कोटींचा खर्च आला. तसंच लोकांकडून क्रॉस सबसिडीतील पैसापण कोरोना काळात मिळाला नाही. त्यामुळे महावितरणचे 20 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, तसेच किमान 40 हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आलेली आहे.