कांद्याच्या दरात मोठी घसरण

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

शेतकऱ्यांनी साठवण करून ठेवलेला जुना कांदा अजून बखारीमध्ये असतानाच नवीन कांद्याच्या लागवडी सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ होत असताना शेतकऱ्यांना मात्र दिवसभर पाण्यात राहून लागवड करावी लागत आहे. या परिस्थितीत पहिलाच कांदा वखारीत शिल्लक असताना नवीन कांद्याची लागवड करणे म्हणजे हिवाळ्यातील गारठ्याच्या मानाने शेतकरीवर्ग गारठला अशी प्रतिक्रिया येत आहे .शिरूर तालुक्या मध्ये पश्चिम पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहेत . या भागातील बरेचशे शेतकरी हे कांदा पीकच मोठ्या प्रमाणात घेतात. शिवाय दिवाळीनंतर कांद्याच्या लागवडी सुरू होतात. त्यामुळे उन्हाळ्यात काढलेला कांदा साठवणूक करण्यावर या शेतकऱ्यांचा भर असतो.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

व्यापाऱ्यांनीदेखील साठवला कांदा

कांदा उत्पादक शेतकन्यांबरोबरच काही व्यापाऱ्यांनीसुद्धा कांदा साठवणूक केलेली आहे. मोठमोठे गोडाऊनसारखे वखारींचे शेड उभारले आहेत. त्यासाठी लोकांनी जागा उपलब्ध करण्यापासून शेड उभारणी पर्यंत मोठ्या प्रकारे सायास करून गुंतवणूक केलेली आहे.परंतू आता कांदा खराब होण्यास सुरुवात झालेली आहे . तरीही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने गुंतवणूकदेखील वसूल होणे अवघड झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.